Sheetal Mhatre : "मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर क्रूरकर्मा खरातला दिलेली पाण्याची जोडणी"; शीतल म्हात्रेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:51 IST2026-03-26T12:50:41+5:302026-03-26T12:51:34+5:30

Sheetal Mhatre And Ashok Kharat : शीतल म्हात्रे यांनी अशोक खरात प्रकरणावरून गंभीर आरोप करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Sheetal Mhatre slams Shivsena UBT Over Ashok Kharat crime case and matoshree water connection | Sheetal Mhatre : "मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर क्रूरकर्मा खरातला दिलेली पाण्याची जोडणी"; शीतल म्हात्रेंचा आरोप

Sheetal Mhatre : "मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर क्रूरकर्मा खरातला दिलेली पाण्याची जोडणी"; शीतल म्हात्रेंचा आरोप

नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ 'कॅप्टन खरात' याच्या अटकेनंतर आता एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच दरम्यान शीतल म्हात्रे यांनी अशोक खरात प्रकरणावरून गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर क्रूरकर्मा खरातला पाण्याची जोडणी दिली होती" असं म्हटलं आहे. 

शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…  यही तो नही “ताज” का राज ? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे…  ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल …" असं म्हणत म्हात्रे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच खरात_फाइल्स हा हॅशटॅग वापरला आहे. 

"नादाला लागाल तर तुमचे नामोनिशाण नष्ट करू"; भोंदू अशोक खरातने अंनिसला दिलेली धमकी

"... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर

शीतल म्हात्रे यांच्या या आरोपाला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत.राज्यसभेच्या निमित्ताने एका चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोरे किंवा शितल मात्रे या बायकांचा Self Goal केला ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही असे या तथाकथित स्वयंघोषित शिंदेंच्या निकटवर्तीयांना वाटते."

गुगलच्या 'मोस्ट सर्च्ड' कॅटेगरीत 'भोंदूबाबा' टॉपवर; लोक शोधताहेत अशोक खरातचे काळे कारनामे

 "मी तुझं करिअर घडवेन, विरोध केल्यास वडिलांचा मृत्यू"; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा

"विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल यासाठी दोघीही जोमाने कामाला लागल्या मग सभागृहामध्ये नीलम गोरे अकलेचे तारे तोडायला लागल्या तर सभागृहाच्या बाहेर शीतल म्हात्रे.... म्हात्रे काय गोरे काय... यांचे कवित्व करायला पाने पुरणार नाहीत... दोघींनाही प्रेमळ सल्ला.. आवरा स्वतःला मला संशोधन करण्याची वेळ आणू नका...!" असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 

Web Title : मातोश्री की मैडम के आग्रह पर खूंखार खरात को पानी का कनेक्शन: म्हात्रे

Web Summary : शीतल म्हात्रे ने उद्धव ठाकरे पर आरोप लगाया कि मातोश्री की मैडम के आग्रह पर अशोक खरात को पानी का कनेक्शन दिया गया. सुषमा अंधारे ने पलटवार करते हुए म्हात्रे के आरोपों को आगामी चुनावों से जोड़ा।

Web Title : Water connection to criminal Kharat given on Matoshree Madam's insistence: Mhatre

Web Summary : Sheetal Mhatre accuses Uddhav Thackeray, stating a water connection was granted to Ashok Kharat due to Matoshree Madam's insistence. Sushma Andhare retaliated, linking Mhatre's allegations to upcoming elections.