राज्य सावरण्यासाठी शरद पवारांची धडपड अद्भुत, राऊतांकडून कामाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 10:59 PM2020-05-17T22:59:35+5:302020-05-17T23:00:21+5:30

मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत असून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट देत पाहणी केली.

Sharad Pawar's struggle to recover the state is wonderful, work appreciated by Sanjay Raut MMG | राज्य सावरण्यासाठी शरद पवारांची धडपड अद्भुत, राऊतांकडून कामाचं कौतुक

राज्य सावरण्यासाठी शरद पवारांची धडपड अद्भुत, राऊतांकडून कामाचं कौतुक

Next

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या कामाचं कौतुक केले आहे. कोरोना संकटाच्या काळात राज्य सावरण्यासाठीची त्यांची धडपड अद्भुत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोरोना संकटाच्या परिस्थितीचा हॉटस्पॉटवरु जाऊन आढावा घेताना दिसून आले. गेल्या ५० दिवस घरी बसून लॉकडाऊनचं पालन करणारे पवार, शुक्रवारी मैदानात उतरल्याचं अनेकांनी पाहिलं.

मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत असून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट देत पाहणी केली. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आलेख आणि मुंबईतील हॉटस्पॉट झोनची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन कालावधीत तब्बल ५० दिवस घरी असणारे शरद पवार मैदानात उतरल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी क्वारंटाईन सुविधांची पाहणी केली. पवारांच्या या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं म्हटलंय. 

लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठीही शरद पवार यांनी खास हजेरी लावली होती. या बैठकीला, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांच्याशी अनेक विषयावर चर्चा झाल्याचं सांगितलंय. महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल ते समाधानी असून राज्य सरकार सावरण्यासाठी त्यांची धडपड अद्भुत असल्याचंही राऊत यांनी म्हटलं.  

शरद पवार हे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून नियमित पालन करताना दिसून आले. मात्र, फेसबुक लाईव्ह  आणि फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून ते जनतेशी आणि सरकारमधील मंत्र्यांशी कायम चर्चा करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत त्यांनी व्हिडिओ कॉन्फेरेन्सिंगद्वारेही चर्चा केली. राज्यातील आणि देशातील मराठीजनांसाठी फेसबुक लाईव्हद्वारेही ते संवाध साधताना, प्रश्नांना उत्तरं देताना दिसून आले.  

दरम्यान, लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासमोर आव्हान उभे ठाकले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. केंद्र सरकारने जे पॅकेज दिले आहे त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायची तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे वैद्यकीय संकट कसे रोखायचे व दुसरीकडे आर्थिक आघाडीवर ठामपणे कसे उभे राहायचे यासाठी तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालावरही चर्चा झाली. 

Web Title: Sharad Pawar's struggle to recover the state is wonderful, work appreciated by Sanjay Raut MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.