सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद; पण उज्वल निकम म्हणाले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 16:57 IST2023-02-23T16:57:04+5:302023-02-23T16:57:21+5:30

कपिल सिब्बल यांच्या भावनिक युक्तिवादावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Senior legal expert Ujwal Nikam has reacted to Kapil Sibal's emotional argument. | सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद; पण उज्वल निकम म्हणाले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत

सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद; पण उज्वल निकम म्हणाले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत

मुंबई: सलग तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंर्घषाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. तीन दिवसांपासून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले. न्यायलयाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे वकील मनु सिंघवी मंगळवारी थोडा वेळ घेईन, असं सांगितले. तसेच शिंदे गटाला देखील आपला युक्तिवाद मांडण्यासाठी पुरेसा वेळ न्यायालयाकडून दिला जाणार आहे.

मी हे किंवा ते गृहीत धरतो असे राज्यपाल म्हणू शकत नाहीत. ही घटनात्मक प्रक्रिया आहे. त्यांनी सरकार पाडणे रोखायचे आहे. यावर न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांनी तुम्ही म्हणता की घटनात्मकदृष्ट्या दखल घेणे अनुज्ञेय आहे? असा प्रश्न विचारला. राज्यपाल सरकार पाडण्यात मदत करू शकत नाहीत, असे उत्तर सिब्बल यांनी दिले. तसेच मी ही केस जिंकेन किंवा हरेन, यासाठी मी इकडे उभा नाहीय, तर घटनात्मक नैतिकता टिकण्यासाठी मी इथे उभा आहे, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी भावनिक युक्तिवाद करत भावनिक शेवट केला. 

कपिल सिब्बल यांच्या भावनिक युक्तिवादावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांनी आज भावनास्पर्श युक्तिवाद केला. कारण कायद्याच्या मुद्द्याबरोबर असं झालं नाही, तर लोकशाही संपेल अशा प्रकारचे भावनेला हात घालणारे मुद्देही आले. अर्थात, हे घटनापीठ असल्यामुळे ते या मुद्द्यांचा आणि घटनेचा संबंध कसा लावता येईल, हे घटनापीठ बघेल, असं उज्जव निकम यांनी सांगितले. तसेच अद्यापही सुनावणी पूर्ण झालेली नाही. शिंदे गटाचंही म्हणणं अजून ऐकायचं आहे. घटनापीठ प्रामुख्याने आमदारांच्या अपात्रतेकडे लक्ष केंद्रीत करेल. पण आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं त्यांनी तोंडी सांगितलं. पण अध्यक्षांनी म्हणजे कोणत्या अध्यक्षांनी हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याचं उज्वल निकम यांनी सांगितलं.

त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी- सिब्बल

मविआकडे १२३ संख्याबळ आणि विरोधकांकडे १०६ संख्याबळ आहे. आमच्याकडे आजही संख्याबळ आहे, असे सिब्बल यांनी सांगितले. शिंदेंच्या बंडखोरीमुळे तुमच्याकडे बहुमत नव्हते, असे सरन्यायाधीशांनी सिब्बलांना सांगितले. शिवसेनेकडे ५५ पैकी ३८ आमदार बाजुला गेले. यामध्ये १६+२२ ना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे शिवसेनेकडे १७+ राष्ट्रवादीकडे ५३ आहेत. तर काँग्रेसकडे ४४ संख्या आहे. यावर सिब्बल यांनी त्यात जायची गरज नाहीय, कारण आधी त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हायला हवी होती असे सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Senior legal expert Ujwal Nikam has reacted to Kapil Sibal's emotional argument.