Join us
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील, अमरिश पटेल विधान परिषदेवर; भाजप-काँग्रेसचे ‘गिव्ह अँड टेक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 10:49 IST

कोल्हापुरात सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक अमल महाडिक ही लढत गाजली असती. सूत्रांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. त्यांचा फॉर्म्युला मान्य झाला.

मुंबई : शुक्रवारी भाजप-काँग्रेसमध्ये ‘गिव्ह अँड टेक’ झाले. कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राज्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील हे भाजपचे अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने, तर धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार अमरिश पटेल हे काँग्रेसच्या माघारीमुळे बिनविरोध निवडून आले. कोल्हापुरात सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक अमल महाडिक ही लढत गाजली असती. सूत्रांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. त्यांचा फॉर्म्युला मान्य झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही  दिल्लीतून हिरवा झेंडा मिळाला आणि दोन्ही जागांची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. 

मुंबईच्या दोन्ही जागा बिनविरोध -मुंबईमध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंससिंह यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. गेल्यावेळी एक जागा शिवसेनेकडे, तर दुसरी काँग्रेसकडे होती. 

टॅग्स :विधान परिषदअमरीशभाई पटेलसतेज ज्ञानदेव पाटीलभाजपाकाँग्रेस