Santosh Deshmukh Case : '... मी त्या दिवशी जाऊन संतोष देशमुखांपुढे डोकं टेकेन'; अंजली दमानियांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:54 IST2025-03-04T12:48:15+5:302025-03-04T12:54:27+5:30
Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

Santosh Deshmukh Case : '... मी त्या दिवशी जाऊन संतोष देशमुखांपुढे डोकं टेकेन'; अंजली दमानियांचा निर्धार
Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : ते तब्येत बरी नाही म्हणून राजीनामा दिला आहे असं ट्विट करुन सांगत आहेत. मला काल तुम्ही फेरफटका मारायला आला होता. या माणसाचा राजीनामा नाही तर त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होते. आता माझ धनंजय मुंडेंना चॅलेंज आहे. मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे, मी त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्यासमोर डोकं टेकेन, असा निर्धार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
'आरोपींनी देशमुखांवर नाही, प्रशासनावर 'लघवी' केली, त्यांना फाशी झाली पाहिजे'; करुणा शर्मांची मागणी
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, मी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेऊन बीडला जाऊन संतोष देशमुख यांच्यासमोर डोकं टेकेन. एवढंच नाहीतर करुणा मुंडे, रेणुका शर्मा या प्रत्येक स्त्रीला त्यांनी जेवढं छळलं आहे. मी त्यांच्याबद्दल कधी बोलले नव्हते. या सगळ्याचे त्यांना आज शिक्षा मिळाली आहे, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.
"तुम्ही आजारी आहे म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला हे कोणाला पटेल का?, असा सवालही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.
करुणा शर्मांची मागणी
करुणा शर्मा यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. करुणा शर्मा म्हणाल्या, आज महाराष्ट्राला न्याय मिळेल. काल मी एक फोटो बघितला. या फोटो संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या तोंडावर लघवी करत असल्याचे दिसत आहे. या लोकांची मानसिक स्थिती दिसत आहे. हसत हसत संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे फोटो, व्हिडीओ काढत आहेत. वाल्मीक कराड तो व्हिडीओ लाईव्ह बघत आहे. आपला महाराष्ट्र कुठे गेला आहे?, असा सवालही करुणा शर्मा यांनी केला.
या लोकांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. ते लोक खूप क्रूर आहेत. ते लोकांच्या समोर आले आहेत. या लोकांनी लघवी केली आहे ती संतोष देशमुखांच्या चेहऱ्यावर नाही तर प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी लघवी केली आहे, असा आरोपही शर्मा यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी जे कोण आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली होती. आता ही त्यांची मागणी पूर्ण केली पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करुण शर्मा यांनी केली. अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, त्यांनी मुंडे यांना पाठीशी घातले आहे, असंही शर्मा म्हणाल्या.