Sanjay Raut: संजय राऊतांकडून अजित पवारांचं कौतुक, तर नारायण राणेंवर निशाणा; व्हिडीओ केला ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 13:59 IST2023-02-24T13:45:12+5:302023-02-24T13:59:51+5:30
गेल्या काही दिवसापासून शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे, शिवसेनेतील फुटीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

Sanjay Raut: संजय राऊतांकडून अजित पवारांचं कौतुक, तर नारायण राणेंवर निशाणा; व्हिडीओ केला ट्विट
मुंबई- गेल्या काही दिवसापासून शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे, शिवसेनेतील फुटीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज ट्विट करुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केले आहे. या ट्विटमध्ये व्हिडीओ दिसत आहे.
"दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा!सहज सोप्या भाषेत थेट संदेश!जय महाराष्ट्र!", असं ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे. यात एक व्हिडीओही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार एका कार्यक्रमात बोलत असल्याचे दिसत आहेत.
दादा म्हणजे कमाल आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 24, 2023
कमाल की चीज!
नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा!
सहज सोप्या भाषेत थेट संदेश!
जय महाराष्ट्र! https://t.co/DnjCD4lCZl
या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत अजित पवार बोलत आहेत. या व्हिडीओत "नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. यातील सगळे पडले, यानंतरच्या निवडणुकीत नारायण राणे स्वत: पडले. बांद्रा येथील निवडणुकीत नारायण राणे यांना एका महिलेने पाडले, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्याचे दिसत आहे.
शिवनेत ४० मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. आता शिवसेना कोणाची यावरुन सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेनेत बंड केलेल्या सगळ्यांचा पराभव होणार अशी टीका ठाकरे गटातील नेत्यांनी केली आहे.