Join us  

पंतप्रधान नरेंद्र मोदी अशिक्षित-अडाणी, संजय निरुपम यांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 10:44 AM

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. यावेळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

मुंबई - आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. यावेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपाच्या धोरणांवर हल्लाबोल चढवताना संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अशिक्षित-अडाणी असा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित 'चलो जीते है' लघुपट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला निरुपम यांनी विरोध दर्शवला. यावेळेस ते असंही म्हणाले की, ''मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. पंतप्रधान मोदींकडून शाळेतील विद्यार्थी काहीही शिकणार नाहीत.मोदींसारख्या अशिक्षित आणि अडाणी व्यक्तीच्या आयुष्यावर बनवण्यात आलेला लघुपट पाहून मुलं काय शिकणार आहेत?. पंतप्रधानांकडे किती डिग्री आहेत, हेदेखील लोकांना माहिती नाही''.

(हेलिकॉप्टर खरेदीत मुख्यमंत्र्यांनी रुपयाचे आणखी अवमुल्यन केले : निरुपम)

दरम्यान,  संजय निरुपम यांच्या विधानाचा भाजपा नेत्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'चलो जीते हैं' हा लघुपट 18 सप्टेंबरला राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्यात येणार आहे. शाळांमध्ये लघुपट दाखवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. जिल्हाप्रमुख, शिक्षणाधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षकांना यासंबंधीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. काही शिक्षकांनी यावर आक्षेप नोंदवल्यानंतर, अशा कोणत्याही सूचना शाळांना आमच्याकडून दिल्या गेलेल्या नाहीत, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  

 elearning.parthinfotech.in  या संकेतस्थळावर हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत शाळांमध्ये हा लघुपट दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, सर्व शाळांनी या लघुपटाच्या प्रक्षेपणासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटरची सोय करायची आहे, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.मंगेश हडवळे दिग्दर्शित 'चलो जीते हैं'  लघुपट 32 मिनिटांचा आहे. 

राज्य शासनाच्या या  निर्णयावर टीका करताना संजय निरुपम यांची जीभ घसरली. 

टॅग्स :नरेंद्र मोदीसंजय निरुपमभाजपाविद्यार्थी