ठाकरेंना धक्का! अनिल परब यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकाने शिंदे गटात केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 03:57 PM2023-06-27T15:57:10+5:302023-06-27T16:24:10+5:30

या प्रसंगी त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता.

Sanjay Agaldare, a former corporator of the Thackeray group, has joined the Shinde group today. | ठाकरेंना धक्का! अनिल परब यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकाने शिंदे गटात केला प्रवेश

ठाकरेंना धक्का! अनिल परब यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकाने शिंदे गटात केला प्रवेश

googlenewsNext

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९९चे माजी नगरसेवक संजय गुलाबराव अगलदरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रसंगी त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता. संजय अगलदरे यांनी देखील ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केल्यानं ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे.

शिंदे-फडणवीस सरकार आलं आणि चांगल्या कामांना सुरुवात झाली. या सरकारनं अनेक चांगल्या सेवा दिल्या आहेत. बाळासाहेबांचं  हिंदुत्वाचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक थांबलेली विकास काम पुन्हा नव्यानं सुरू झाली आहेत, असं संजय अगलदरे यांनी शिंगे गटात प्रवेश केल्यानंतर सांगितले. संजय अगलदरे यांची माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख होती. संजय अगलदरे हे ३ वेळा नगरसेवक राहिले आहेत. एकदा वरळी तर २ वेळा खार दांडा येथून ते नगरसेवक झाले आहेत.

संजय अगलदरे यांच्यासह शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार संजय शिरसाठ, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, सचिव सुशांत शेलार, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे उपस्थित होते.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Sanjay Agaldare, a former corporator of the Thackeray group, has joined the Shinde group today.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.