ठाकरेंना धक्का! अनिल परब यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकाने शिंदे गटात केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 16:24 IST2023-06-27T15:57:10+5:302023-06-27T16:24:10+5:30
या प्रसंगी त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता.

ठाकरेंना धक्का! अनिल परब यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकाने शिंदे गटात केला प्रवेश
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९९चे माजी नगरसेवक संजय गुलाबराव अगलदरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रसंगी त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता. संजय अगलदरे यांनी देखील ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केल्यानं ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे.
#मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९९चे माजी नगरसेवक संजय गुलाबराव अगलदरे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकऱ्यांचाही समावेश होता. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.#Mumbai… pic.twitter.com/1AP9gvGIn6
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2023
शिंदे-फडणवीस सरकार आलं आणि चांगल्या कामांना सुरुवात झाली. या सरकारनं अनेक चांगल्या सेवा दिल्या आहेत. बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक थांबलेली विकास काम पुन्हा नव्यानं सुरू झाली आहेत, असं संजय अगलदरे यांनी शिंगे गटात प्रवेश केल्यानंतर सांगितले. संजय अगलदरे यांची माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख होती. संजय अगलदरे हे ३ वेळा नगरसेवक राहिले आहेत. एकदा वरळी तर २ वेळा खार दांडा येथून ते नगरसेवक झाले आहेत.
संजय अगलदरे यांच्यासह शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार संजय शिरसाठ, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, सचिव सुशांत शेलार, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे उपस्थित होते.