Sachin Vaze transfer : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 03:34 PM2021-03-12T15:34:40+5:302021-03-12T15:49:43+5:30

Sachin Vaze transfer : सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत केली होती.

Sachin Vaze transfer: Police officer Sachin Vaze transferred twice a day | Sachin Vaze transfer : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली  

Sachin Vaze transfer : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली  

googlenewsNext
ठळक मुद्देमनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर खुनाचा आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती.

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Case) अडचणीत सापडलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे (Sachin Vaze)  यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली होती. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले होता. मात्र, आता पुन्हा त्यांची एसबी-१ म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली आहे. (Mumbai police officer Sachin Vaze twice in the same day)

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचा तपास सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. यातच काही दिवसांपूर्वी या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला. यानंतर सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याशिवाय, मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर खुनाचा आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. 

सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवले जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचे कारण काय, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावे लागले आणि सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांची कोणत्या विभागात बदली होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

(पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली)

सचिन वाझेंची ATS कडून 10 तास चौकशी
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यानंतर सचिन वाझेंनी ATS ने दहा तास चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय म्हणाले  होते अनिल देशमुख?
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. सचिन वाझे असो वा कुणीही, शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी त्यांच्याकडील पुरावे एटीएसला द्यावेत, तसंच सचिन वाझे यांची बदली करण्यात येत असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानपरिषदेत सांगितले होते.

(अखेर सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून उचलबांगडी होणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा)

Web Title: Sachin Vaze transfer: Police officer Sachin Vaze transferred twice a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.