Sachin Vaze: मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सचिन वाझे पोहचले 'डोंगरी'त; बारवर धाड टाकण्याचं देखील केलं ढोंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 01:52 PM2021-03-25T13:52:34+5:302021-03-25T13:53:14+5:30

Mansukh Hiren Case: एटीएसने टिप्सी बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, यामध्ये सचिन वाझे (Sachin Vaze) ११ वाजून ३८ मिनिटांनी आपल्या कारमधून उतरताना दिसत आहे.

Sachin Vaze: After the assassination of Mansukh Hiren, Sachin Vaze reached Dongari | Sachin Vaze: मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सचिन वाझे पोहचले 'डोंगरी'त; बारवर धाड टाकण्याचं देखील केलं ढोंग

Sachin Vaze: मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सचिन वाझे पोहचले 'डोंगरी'त; बारवर धाड टाकण्याचं देखील केलं ढोंग

googlenewsNext

मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणात  (Mansukh Hiren Case) महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस ) ठाणे न्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. मनसुख हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी दिले आहेत. शिवाय, एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि क्रि केट बुकी नरेश गोर या दोन्ही आरोपींचाही ताबा एनआयएकडे देण्याचेही आदेश दिले आहेत. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझे (Sachin Vaze) तिथे उपस्थित होते, असा संशय एटीएसनं एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच एटीएसच्या माहितीनुसार, मनसुख हिरेनच्या हत्येनंतर सचिन वाझे यांनी मुंबईतल्या डोंगरी परिसरातील टिप्सी बारवर धाड टाकण्याचं ढोंग केल्याचंही एटीएसनं आपल्या अहवालात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 

Mansukh Hiren Case: ...अन् मनसुख हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले; त्या ५ रुमालांमुळे संशय आणखी वाढला

एटीएसने अहवालात नमूद केलं आहे की, मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर रात्री ११ वाजून ४८ मिनिटांनी सचिन वाझे डोंगरीमध्ये गेले होते. मात्र त्या दिवशी सचिन वाझे यांना कॉल आला नव्हता. त्यांनी धाड टाकण्याचं फक्त ढोंग केलं. एटीएसने टिप्सी बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, यामध्ये सचिन वाझे ११ वाजून ३८ मिनिटांनी आपल्या कारमधून उतरताना दिसत आहे. तसेच मनसुख हिरेन यांचे रात्री 9 च्या सुमारास अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांचा फोन काढून घेण्यात आला. त्यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत फेकण्यात आला, असा अंदाज देखील एटीएसने व्यक्त केला आहे. 

मनसुख हिरेन प्रकरणी अनेक गाड्या देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकण्यात आलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी, हिरेन यांचा मृतदेह सापडला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यांच्या नाकात आणि तोंडात रुमाल कोंबण्यात आले होते. एकूण पाच रुमाल त्यांच्या तोंडात खूपसण्यात आले होते. हे रुमाल रोल करण्यात आले होते.

स्कॉर्पिओ कारमधील धमकीचं पत्र सचिन वाझेंनीच ठेवलं-

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारमधील धमकीच्या पत्राचं रहस्य उलगडलं आहे. NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटिलियाजवळ पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेले धमकीचं पत्र स्वत: निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ठेवलं होते.

सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीत याची कबुली दिली आहे. विनायक शिंदे यांच्या घरी सापडलेल्या एका प्रिंटरच्या माध्यमातून हे इंग्रजी पत्र तयार केलं होतं. ज्याचा तपास फॉरेन्सिक टीममार्फत करण्यात येत आहे. आज एनआयए सचिन वाझे व्यतिरिक्त मनसुख हिरण यांच्या हत्येतील आरोपी विनायक शिंदे आणि नरेश यांच्या कोठडीची मागणी करणार आहे. कोठडी मिळाल्यानंतर नरेश आणि विनायक यांची चौकशी केली जाणार आहे. काही दिवसांनी या सर्वांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाऊ शकते.

Web Title: Sachin Vaze: After the assassination of Mansukh Hiren, Sachin Vaze reached Dongari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.