Rohit Pawar: ट्विटर खरेदी करणाऱ्या इलॉन मस्कला रोहित पवारांचा ट्विटरवरुनच उपरोधात्मक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 13:37 IST2022-04-26T13:36:09+5:302022-04-26T13:37:01+5:30
एलन मस्क यांसमवेत सुमारे ४४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीमध्ये ट्विटरचा व्यवहार झाला आहे.

Rohit Pawar: ट्विटर खरेदी करणाऱ्या इलॉन मस्कला रोहित पवारांचा ट्विटरवरुनच उपरोधात्मक टोला
मुंबई - सोशल मीडियावर, त्यातही ट्विटवर कायम एक्टिव्ह असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे विविध मुद्द्यावर मत व्यक्त करत असतात. अनेकदा, बड्या राजकीय नेत्यांना ते ट्विटरवरुन टोलेही लगावत असतात. आता टेस्कला कंपनीचे सहसंस्थापक आणि नुकतेच ट्विटर खेरदी करणारे उद्योजक इलॉन मस्क यांनाही उपरोधात्मक टोला लगावला आहे. इलॉन मस्क यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केली आहे. त्यानंतर, ट्विटरवर ते ट्रेंड करत आहेत. तसेच, सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा होताना दिसून येते.
इलॉन मस्क यांसमवेत सुमारे ४४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीमध्ये ट्विटरचा व्यवहार झाला आहे. त्याबरोबरच २०१३ पासून पब्लिक चालत असलेली ही कंपनी आता प्रायव्हेट झाली आहे. मात्र, मस्क यांनी कंपनी विकत घेतल्याने आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल आणि ट्विटर पुन्हा चर्चेत आलं आहे. त्यातूनच, मस्क यांची जगभरात चर्चा आहे. अनेकजण या खरेदीवर भाष्य करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत एलन मस्क यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
Twitter is better now!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 26, 2022
फक्त fake माहितीला आळा घातला तर लोकशाहीसह अनेक गोष्टींचा गळा घोटला जाणार नाही! मला विश्वास आहे आपण हे नक्की कराल!
Twitter is better now!
If only fake info cld be curbed, thn many things including democracy wld not be strangled!
I'm sure @elonmusk will do!
Twitter is better now! फक्त fake माहितीला आळा घातला तर लोकशाहीसह अनेक गोष्टींचा गळा घोटला जाणार नाही! मला विश्वास आहे आपण हे नक्की कराल!, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. रोहित पवार यांनी आपल्या मनातील अपेक्षाही बोलून दाखवली.
कंपनीचं भवितव्य धोक्यात - अग्रवाल
ट्विटरची विक्री झाल्यानंतर आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पराग अग्रवाल यांनी या व्यवहारानंतर मोठं विधान केलं आहे. पराग अग्रवाल यांनी सोमवारी कंपनीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एलन मस्क यांना कंपनीची विक्री केल्याने कंपनीचे भविष्य अंधारात आल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे.
तर पराग अग्रवाल यांना मिळतील कोट्यवधी रुपये
ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीतून बाहेरची वाट दाखवली गेल्यास त्यांना सुमारे ४.२ कोटी डॉलर (सुमारे ३२१.६ कोटी रुपये) मिळतील. रिसर्च फर्म Equilar ने दिलेल्या माहितीनुसार जर सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीची विक्री झाल्याच्या १२ महिन्यांच्या आत ट्विटरमधून निरोप दिला गेल्यास सुमारे ४.२ कोटी डॉलर मिळणार आहेत. सध्या, ट्विटर, एलन मस्क आणि पराग अग्रवाल सध्या ट्रेंड करत आहेत. त्यातच, अग्रवाल यांनी मोठं विधान केलं आहे.