पालेभाज्यांच्या दरात वाढ, टोमॅटो स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST2021-01-13T04:11:51+5:302021-01-13T04:11:51+5:30

मुंबई : गेल्या काही दिवसांत भाज्यांची आवक कमी झाली असून, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे वाढले आहेत. ...

Rising prices of leafy vegetables, tomatoes cheaper | पालेभाज्यांच्या दरात वाढ, टोमॅटो स्वस्त

पालेभाज्यांच्या दरात वाढ, टोमॅटो स्वस्त

मुंबई : गेल्या काही दिवसांत भाज्यांची आवक कमी झाली असून, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे वाढले आहेत. मात्र, टोमॅटोची आवक वाढली असून, ४० वरून १५ रुपये किलो दराने मिळत आहे.

मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे.

मेथी २५ , शेपू २५, लालमाठ १५, चवळी १५, कोथिंबीर १५ रुपये जुडी मिळत आहे, तर फरसबी ६०, वाल ६० रुपये किलो मिळत आहेत. शेवगा ६०, पडवळ, तोंडली ४०, मिरची ४० किलो दराने मिळत आहे.

फळांच्या दरातही ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

सफरचंद १६० रुपये, डाळिंब ११०, मोसंबी ५०, संत्री ८० प्रतिकिलो मिळतात, तर केळी ४० डझन, किवी ४ नग १००, चिकू ६० रुपयांना मिळत आहेत. मोसंबी आणि संत्र्याच्या दरात मोठी घट होऊन दर निम्यावर आले आहेत.

किराणा मालाचे दर जैसे थे आहेत. मूगडाळ ११० ते १२०, तूरडाळ ९० ते १५०, मसूर डाळ ७० ते ८०, चणाडाळ ६० ते ८० प्रतिकिलो दराने मिळत आहे, तसेच ते सूर्यफूल, शेंगदाणा आणि पामतेलाचे दर जैसे थे आहेत.

टोमॅटोचे उत्पादन वाढले आहे, त्यामुळे आवकही वाढली आहे. आवक जास्त झाली, तर दर कमी होतात. ४० रुपये किलो असणारे टोमॅटो आता १५ रुपये किलो दराने मिळत आहेत.

विकास साने, भाजीविक्रेता

आता ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. तेलाचा पुरवठा सध्या कमी आहे. तेल आणखी महागले आहे. चणा, मूग, तूर डाळींचे दर जैसे थे आहेत. मात्र, नवीन डाळी आल्यास दरात घट होईल.

प्रशांत शिंदे, व्यापारी

गेल्या काही दिवसांत भाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले होते, पण आता पुन्हा भाज्या महागण्यास सुरुवात झाली आहे.

आरती वाघचौरे

Web Title: Rising prices of leafy vegetables, tomatoes cheaper