प्रियकरासह त्याच्या भावाकडून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:17 IST2020-12-04T04:17:42+5:302020-12-04T04:17:42+5:30

तरुणीचा आरोप : ओशिवरा पाेलिसांत दखलपात्र गुन्ह्याची नाेंद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रियकर आणि त्याच्या भावाने लैंगिक अत्याचार ...

Rape by her brother with boyfriend | प्रियकरासह त्याच्या भावाकडून बलात्कार

प्रियकरासह त्याच्या भावाकडून बलात्कार

तरुणीचा आरोप : ओशिवरा पाेलिसांत दखलपात्र गुन्ह्याची नाेंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रियकर आणि त्याच्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप २३ वर्षीय तरुणीने केला. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी दोघांवर दखलपात्र गुन्हा नोंद करून तो बांगुरनगर पोलिसांना वर्ग केला.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१८ मध्ये तिची मैत्री इन्स्टाग्रामवरून अजय हरिजन नामक तरुणाशी झाली. या दोघांनी एकमेकांना आपापले मोबाइल क्रमांक दिले. त्यानंतर त्यांचे एकमेकांशी बोलणे व्हायचे. याच दरम्यान अजयने १० जून, २०१८ मध्ये तिला गोरेगावच्या राम मंदिर परिसरात भेटायला बोलावले. त्यानंतर ते दोघे जुहू बीचवर फिरायला गेले. नंतर त्यांनी लग्न करायचे ठरविले. अजयने तिची कुटुंबीयांशी ओळख करून दिली.

पुढे व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली तिच्याकडे ५० हजारांची मागणी केली. तिने बँकेतून कर्ज काढून त्याला पैसे दिले. मात्र व्यवसायात नुकसान झाल्याचे अजयने तिला सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाले. नंतर ही तरुणी घरातून पळून अजयच्या गोरेगावमधील घरात राहू लागली. दरम्यान, अजयचा भाऊ विजयने ऑगस्ट,२०२० मध्ये घरातील सदस्य बाहेर गेल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला आणि तिला धमकावले. तसेच नंतर अजयच्या कुटुंबीयांनी तिला शिवीगाळ करून घरातून हाकलून दिल्याची तक्रार तिने ओशिवरा पोलिसांत केली.

.........................

Web Title: Rape by her brother with boyfriend