Rape by calling home under the name of business | ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

ऑनलाईन काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावून इंजिनिअर मुलीवर बलात्कार

मुंबई : ऑनलाइन काम देण्याचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार गोरेगावमध्ये घडला. तसेच त्याचा व्हिडीओ तयार करून तिच्याकडून ३५ लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी जफरिया खान (२८) नामक तरुणाला रविवारी अटक केली.

पीडिता ही आयटी इंजिनीअर असून ऑनलाइन व्यावसायिक आहे. मार्च, २०१८ मध्ये खानने तिला मालाड पूर्वच्या राणी सती मार्गावर असलेल्या इमारतीतील घरात कामाच्या निमित्ताने बोलावले. तेथे शीतपेयात नशेचे औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.  त्याचा व्हिडीओ बनवून तो तिला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता. त्याने तिच्याकडून जवळपास ३५ लाख रुपये उकळले.  मात्र त्याचा त्रास वाढत चालल्याने तिने मार्च, २०१९ ला दिंडोशी पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस पथक त्याच्या मागावर होते. अखेर पाेलिसांनी तपासाअंती गुलबर्गला जाऊन त्याला अटक केली. लाॅकडाऊनच्या काळात ऑनलाइन  फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. पोलिसांवर त्याचा ताण वाढला आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rape by calling home under the name of business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.