रामराज्य मागितलं होतं, मंदिर नव्हे; राज ठाकरेंचा सेना, भाजपासह हिंदुत्ववाद्यांवर 'राम'बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 07:45 PM2018-11-25T19:45:31+5:302018-11-25T19:47:40+5:30

अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेसह विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आज देशातील वातावरण ढवळून निघाले होते.

Ramrajya was sought, not a temple; Raj Thackeray attack on Shiv Sena, BJP and pro-Hindu activists | रामराज्य मागितलं होतं, मंदिर नव्हे; राज ठाकरेंचा सेना, भाजपासह हिंदुत्ववाद्यांवर 'राम'बाण

रामराज्य मागितलं होतं, मंदिर नव्हे; राज ठाकरेंचा सेना, भाजपासह हिंदुत्ववाद्यांवर 'राम'बाण

googlenewsNext

मुंबई -  अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेसह विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आज देशातील वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौराही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र निवडणुकांपूर्वी राम मंदिराचा मुद्दा तापवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपा, शिवसेना आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून राम'बाण' सोडला आहे. 

''देशवासियांनी तुमच्याकडे रामराज्याची मागणी केली होती राम मंदिराची नव्हे, असा टोला राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रामधून हाणला आहे. हे राम अशा शीर्षकाखाली प्रकाशित केलेल्या या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरे यांनी उन्मादी हिंदुत्वावर टीका केली आहे. या चित्रामध्ये राम आणि लक्ष्मण हिंदुत्ववाद्यांकडे हताशपणे पाहत आहेत, तसेच अहो तुम्ही देश खड्ड्यात घातलाय, मग आता माझ्या नावाने का गळे काढत आहात. लोकांनी तुमच्याकडे राम राज्याची मागणी केली होती. राम मंदिराची नव्हे, असे श्रीराम या हिंदुत्ववाद्यांना विचारत आहेत."

 

Web Title: Ramrajya was sought, not a temple; Raj Thackeray attack on Shiv Sena, BJP and pro-Hindu activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.