Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:29 IST2025-12-24T12:28:47+5:302025-12-24T12:29:42+5:30
Raj-Uddhav Thackeray at Shivatiirth: दोन्ही बंधू एकत्रितपणे एकाच वाहनातून प्रवास करत होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्रित अभिवादन केले.

Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
मुंबई - महाराष्ट्रातील जनतेला कित्येक दिवसांपासून उत्सुकता लागलेली ठाकरे बंधू यांच्या युतीची घोषणा आज होत आहे. ही युती केवळ २ राजकीय पक्षाची नाही तर दुरावलेल्या दोन मनांची आहे. ठाकरे कुटुंबासाठी हा सर्वात मोठा क्षण आहे. त्यामुळे युतीच्या घोषणेपूर्वी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले. याठिकाणी दोन्ही भावांची भेट झाली. त्याठिकाणी राज ठाकरे यांच्या मातोश्री यांनी दोन्ही भावांचे औक्षण केले. त्यानंतर संपूर्ण ठाकरे कुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर रवाना झाले.
दोन्ही बंधू एकत्रितपणे एकाच वाहनातून प्रवास करत होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्रित अभिवादन केले. त्याशिवाय रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या प्रतिमेला एकत्रित हार घातला. बाळासाहेब ठाकरे यांना चाफ्याची फुले खूप आवडायची. त्यामुळे चाफ्याचा हार ठाकरे बंधू यांनी स्मृती स्थळावर अर्पण केला. ठाकरे बंधू यांच्या युतीच्या घोषणेची उत्कंठा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. त्यात आज तो ऐतिहासिक क्षण आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray and MNS Chief Raj Thackeray, along with their wives, offer tributes to Balasaheb Thackeray at his memorial in Shivaji Park.
— ANI (@ANI) December 24, 2025
Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray and MNS leader Amit Thackeray are also… pic.twitter.com/7B55TYfi06
मुंबईत महापौर भाजपाचा बसेल - बावनकुळे
कोण कुणाशी युती करते यावर मुंबईकर लक्ष देत नाहीत. मुंबईकर विकासाच्या बाजूने आहेत. जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे दुसरीकडे भकास आहे आणि आमच्याकडे विकास आहे. देवेंद्र फडणवीस सरकार २०१४ साली महाराष्ट्रात आले तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास झाला. दोन्ही बंधू एकत्रित आले तरी काहीही फरक पडणार नाही. कितीही नेते एकत्र आले, गळाभेट घेतली तरी काही होणार नाही. ५१ टक्के मते मुंबईकर महायुतीच्या बाजूने देतील आणि पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून भाजपाचा महापौर मुंबईवर बसेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करत ठाकरे बंधूंवर टीका केली.