राज ठाकरेंकडून अमितच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण रतन टाटांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 21:17 IST2019-01-01T21:16:59+5:302019-01-01T21:17:30+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चिरंजीव अमित ठाकरे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

Raj Thackeray's first invitation to Amit's wedding to Ratan Tata | राज ठाकरेंकडून अमितच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण रतन टाटांना

राज ठाकरेंकडून अमितच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण रतन टाटांना

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चिरंजीव अमित ठाकरे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यामुळे कृष्णकुंजवर लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. या लग्नाच्या पत्रिका छापून तयार झाल्या असून, राज ठाकरेंनी लग्नासाठी पहिलं आमंत्रणही देऊन टाकलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी पहिलं आमंत्रण कोणत्याही राजकीय नेत्याला नव्हे, तर रतन टाटांना दिलं आहे. राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याबरोबर रतन टाटांची भेट घेऊन त्यांना लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका दिली आहे.

तत्पूर्वी राज ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन बाप्पाच्या चरणी पहिली पत्रिका ठेवली. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे 27 जानेवारीला विवाह करणार आहेत. मुंबईतल्या एका आलिशान ठिकाणी राज ठाकरेंच्या मुलाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्याला राज ठाकरे मोजक्याच लोकांना बोलावणार आहेत. कारण मनसे पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच इतर पक्षांचे नेतेमंडळींना निमंत्रण दिल्यास ही संख्याच 5.5 ते 6 लाखांच्या घरात जाते. त्यामुळे राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच लहानपणीची मैत्रीण मिताली बोरुडे हिच्यासोबत अमितचा साखरपुडा झाला. विशेष म्हणजे 11 डिसेंबर रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवशीच दोघांचा साखरपुडा झाला होता. अमित ठाकरे हे अजून राजकारणापासून अलिप्त आहेत. ठाकरे घराण्यात बऱ्याच दिवसानंतर सनईचौघडा वाजणार असल्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा आहे. आपल्या भाषणांसोबत राज ठाकरेंना व्यंगचित्रासाठीही ओळखलं जातं. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेकडे देखील हे टॅलेंट आहे, तो सुद्धा स्केचिंग करतो.

कोण आहे मिताली बोरूडे ?
मिताली आणि अमित ठाकरे हे बालमित्र आहेत. मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि आता विवाहबंधनात होणार आहे. मिताली फॅशन डिझायनर आहे. प्रख्यात बालरोग तज्ञ संजय बोरूडे यांची ती कन्या आहे.

Web Title: Raj Thackeray's first invitation to Amit's wedding to Ratan Tata