लाइव न्यूज़
 • 02:17 PM

  नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार घोषित, नाटय आणि चित्रपट - अमोल पालेकर, शिक्षण - डॉ स्नेहलता देशमुख, चित्र- सुभाष अवचट यांचा समावेश आहे. 10 मार्च रोजी पुरस्कार वितरण सोहळा.

 • 02:17 PM

  नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार घोषित. साहस- सुदर्शन शिंदे आणि महेश साबळे, गायन- पंडित सत्यशील देशपांडे, लोकसेवा- डॉ रविन्द्र आणि स्मिता कोल्हे यांना पुरस्कार जाहीर.10 मार्च रोजी पुरस्कार वितरण सोहळा

 • 01:44 PM

  अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे दुचाकी व कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू.

 • 01:35 PM

  डोंबिवली : मराठी भाषेतील विज्ञान पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम.

 • 01:25 PM

  अहमदनगर : पुणे मार्गावर असणाऱ्या केडगावमध्ये तवेरा आणि दुचाकीच्या अपघातात 3 जणांचा मृत्यू.

 • 01:25 PM

  औरंगाबाद : किराडपुरा येथे काँग्रेसचे माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांची कार अज्ञातांनी जाळली.

 • 12:48 PM

  क-हाड : ‘लव्ह जिहाद’ निषेध रॅलीला परवानगी नाकारली म्हणून पोलीस खात्याविरोधात हिंदू एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांचं क-हाडच्या मुख्य चौकात आंदोलन.

 • 12:24 PM

  नागपूर : शिवाजी नगर, दखनी मोहल्ला झोपडपट्टीत कुख्यात भरत सहारे व त्याच्या मित्रावर गोळीबार. शुक्रवारी मध्यरात्रीची घटना. बाईकवरुन आले होते 7-8 अज्ञात व्यक्ती.

 • 12:06 PM

  रेवसा येथे गजानन महाराज महापारायणानिमित्त शहरातील मुख्य चौकातून 30 हजार वारक-यांची दिंडी निघाली.

 • 12:05 PM

  बीड : मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन.

 • 11:26 AM

  नाशिक : सोनई तिहेरी हत्याकांडातील 6 दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा

 • 11:24 AM

  नाशिक : सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरण, संशियत आरोपींच्या नातेवाईकांभोवती पोलिसांचा गराडा. नावाघिरे कुटुंबीयांचा न्यायालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा .

 • 11:22 AM

  गोवा : टुरिस्ट टॅक्सी बंदला अन्य खासगी वाहन चालकांचाही पाठिंबा, सरकारनं पुढाकार न घेतल्यास बंद पुकारणार, खासगी बस-रिक्षा चालकांचा इशारा.

 • 11:16 AM

  नाशिक : 2013 सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी सुनावणी सुरू, जिल्हा व सत्र न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात.

 • 10:53 AM

  डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन या संस्थेकडून ब्राह्मण सभेमध्ये टुर्स अँड ट्रॅव्हलचे एक्झिबिशन, केडीएमसीचे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केला उपक्रमाचा शुभारंभ.

All post in लाइव न्यूज़