राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट, राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 22:16 IST2018-12-03T22:16:12+5:302018-12-03T22:16:40+5:30
राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आला असल्याचा खळबळजनक दावा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट, राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
मुंबई - राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आला असल्याचा खळबळजनक दावा मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केला आहे. दिल्लीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या फोनचा हवाला देऊन राज ठाकरे म्हणले की, ओवेसी बंधूंच्या मदतीने देशात दंगली घडवण्याचा कट आखण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
विक्रोळी येथील एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हा खळबळजनक दावा केला. दिल्लीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीच्या फोनचा हवाला देऊन राज ठाकरे यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी राज्यात मोठ्या दंगली घडवण्याचा कट आखण्यात आला आहे. ओवेसी बंधूंच्या मदतीने या दंगली घडवण्यात येऊ शकतात.'' दरम्यान, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्य आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे.