मोदीविरोधी प्रचारानंतर राज ठाकरेंचं स्वा. सावरकरांना वंदन; 'तो' ठपका पुसण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 13:32 IST2019-05-28T13:22:20+5:302019-05-28T13:32:44+5:30
राज ठाकरे यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे.

मोदीविरोधी प्रचारानंतर राज ठाकरेंचं स्वा. सावरकरांना वंदन; 'तो' ठपका पुसण्याचा प्रयत्न
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज (मंगळवारी) 136 वी जयंती आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे. राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करुन यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील आपल्यावरील ठपका पुसण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे.
क्रांतिवीरांचे सेनापती, हिंदू संघटक, समाजसुधारक, साहित्यिक, विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता ह्या विषयी ठोस विचारमांडणी करणारे, प्रखर राष्ट्राभिमानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
क्रांतिवीरांचे सेनापती, हिंदू संघटक, समाजसुधारक, साहित्यिक, विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता ह्या विषयी ठोस विचारमांडणी करणारे, प्रखर राष्ट्राभिमानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.#VeerSavarkarpic.twitter.com/innCdcawwK
— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेकांना राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात झोकून देण्याची प्रेरणा दिली, सावरकर हे धाडस, राष्ट्रप्रेमाचे प्रतीकच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरुन म्हटले आहे की, 'विषमतामुक्त समाज... देश, धर्म, भाषा, विचार आणि संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान...! देशभक्तीचे मूर्तिमंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना हीच खरी आदरांजली !
We bow to Veer Savarkar on his Jayanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2019
Veer Savarkar epitomises courage, patriotism and unflinching commitment to a strong India.
He inspired many people to devote themselves towards nation building. pic.twitter.com/k1rmFHz250
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार केला होता. त्यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात बोलणाऱ्या लोकांचा आणि काँग्रेसचा प्रचार राज ठाकरेंकडून केला जात असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी एकप्रकारे विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीस अभिवादन करुन आपल्यावरील ठपका पुसण्याचा प्रयत्न केला आहे की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.
विषमतामुक्त समाज...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 28, 2019
देश, धर्म, भाषा, विचार आणि संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान...!
देशभक्तीचे मूर्तिमंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना हीच खरी आदरांजली !#VeerSavarkarhttps://t.co/v4GuBOno1wpic.twitter.com/axMgyW36yw
(स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामीप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार)