Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकां सांगे...! आणीबाणीवर बोलणाऱ्या मोदींना राज ठाकरेंचा व्यंगचित्रामधून टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 18:56 IST

आणीबाणीवरून काँग्रेस आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून चिमटे काढले आहेत.

मुंबई -  आणीबाणीवरून काँग्रेस आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून चिमटे काढले आहेत. राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामध्ये नरेंद्र मोदी हे देशातील न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, उद्योगपती, प्रसारमाध्यमे यांची गळचेपी करत आहेत, असे दर्शवले आहे. लोका सांगे...! असे शीर्षक देऊन काढलेल्या या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, उद्योगपती, प्रसारमाध्यमे यांच्यावर पाय देऊन उभे असल्याचे दर्शवले आहे. तसेच या सर्वांची गळचेपी केल्यानंतर मात्र हे मोदी इंदिरा गांधी ह्या हिटलर वृत्तीच्या होत्या. त्यांनी देशात आणीबाणी लादली. विचार आणि वाणीस्वातंत्र्याच्या मुसक्या आवळल्या. आणीबाणी ही एक भयानक गोष्ट आहे, असे सांगत सुटल्याचा टोला लगावला आहे. 1975 साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला आज 43 वर्षे पूर्ण झाली. आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा देण्यासाठी सत्ताधारी भाजपाने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील कार्यक्रमात सहभागी होऊन आणीबाणीवरून काँग्रेसला लक्ष्य केले. मात्र स्वत: एकाधिकारशाहीने धोरणे राबवणाऱ्या मोदींच्या उक्ती आणि कृतीमधील फरक राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रामधून समोर आणला आहे. 

टॅग्स :राजकारणराज ठाकरेनरेंद्र मोदीइंदिरा गांधीकाँग्रेसमनसेभाजपा