‘प्राध्यापक हत्येप्रकरणी जबाब देण्यासाठी पुढे या’, रेल्वे पोलिसांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:06 IST2026-01-31T13:05:38+5:302026-01-31T13:06:20+5:30

Mumbai Crime News: प्राध्यापक आलोककुमार सिंह (३३) यांच्या हत्येच्या प्रत्यक्षदर्शींनी जबाब नोंदविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. घटनेच्या वेळी रेल्वे डब्यातील प्रवाशांनी पुढे येऊन जबाब नोंदविणे आवश्यक आहे, असे बोरीवली रेल्वे पोलिसांनी सांगितले.

Railway Police appeals to ‘come forward to answer questions in professor murder case’ | ‘प्राध्यापक हत्येप्रकरणी जबाब देण्यासाठी पुढे या’, रेल्वे पोलिसांचं आवाहन

‘प्राध्यापक हत्येप्रकरणी जबाब देण्यासाठी पुढे या’, रेल्वे पोलिसांचं आवाहन

मुंबई : प्राध्यापक आलोककुमार सिंह (३३) यांच्या हत्येच्या प्रत्यक्षदर्शींनी जबाब नोंदविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. घटनेच्या वेळी रेल्वे डब्यातील प्रवाशांनी पुढे येऊन जबाब नोंदविणे आवश्यक आहे, असे बोरीवली रेल्वे पोलिसांनी सांगितले. विशेषत: महिला प्रवाशांनी त्यांचे जबाब नोंदविणे महत्त्वाचे आहे. मालाड रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला घटनेतील शस्त्र जप्त करण्यात आले असून, आरोपीच्या घरातून त्याचे कपडे हस्तगत केले आहेत. सीसीटीव्ही फूटेजही मिळवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. हे पुरावे न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

आलोक सिंह हे विलेपार्ले पश्चिम येथील नरसी मोनजी महाविद्यालयात प्राध्यापक होते. २४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते सहकारी सुधीरकुमार त्रिवेदी (४१) यांच्यासोबत चर्चगेट–बोरीवली लोकलने प्रवास करीत असताना आरोपी ओंकार शिंदेसोबत वाद झाला. त्यानंतर त्याने फोर्सेप्सने सिंह यांच्यावर वार  केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.  

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
बोरीवली येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आरोपी ओंकार शिंदे (२७) याला शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तपासात पुरेसे पुरावे गोळा झाल्याने आरोपीची पोलिस कोठडी मागितली नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 
आरोपीच्या वतीने बाजू मांडताना बचाव पक्षाच्या वतीने ॲड. यशवंत पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले, सुरुवातीला जीआरपीने हा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल केला होता. 
तसेच संपूर्ण प्रकरण केवळ एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर अवलंबून असून, त्या साक्षीदाराला आरोपी स्पष्टपणे दिसलेला नाही. त्यामुळे मृत व्यक्तीवर नेमका वार कोणी केला, हे अद्याप निश्चित नाही.

Web Title : प्रोफेसर हत्याकांड: रेलवे पुलिस ने गवाहों से आगे आने की अपील की

Web Summary : प्रोफेसर आलोक कुमार सिंह की हत्या में रेलवे पुलिस ने गवाहों से आगे आने की अपील की। एक संदिग्ध हिरासत में है, सबूत एकत्र किए गए हैं। घटना चर्चगेट-बोरीवली लोकल ट्रेन में बहस के बाद हुई। आरोपी न्यायिक हिरासत में है।

Web Title : Railway Police Urge Witnesses to Come Forward in Professor Murder Case

Web Summary : Railway police appeal for witnesses in Professor Alok Kumar Singh's murder. A suspect is in custody, with evidence collected. The incident occurred on a Churchgate-Borivali local train following an argument. The accused is in judicial custody.