कॉंग्रेसला आर्थिक मदतीचा हात; पृथ्वीराज चव्हाणांनी दिले एवढे लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:37 PM2024-01-16T16:37:42+5:302024-01-16T16:39:13+5:30

काँग्रेसच्या क्राऊड फंडिंगला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हायकमांडचा हिरमोड झाला.

Prithviraj Chavan gave a hand of financial help to Congress, this much lakhs rupees of donate for desh | कॉंग्रेसला आर्थिक मदतीचा हात; पृथ्वीराज चव्हाणांनी दिले एवढे लाख

कॉंग्रेसला आर्थिक मदतीचा हात; पृथ्वीराज चव्हाणांनी दिले एवढे लाख

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून सभा, मेळावे, सकंल्प यात्रा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे निवडणुकांसाठी आर्थिक नियोजनही महत्त्वाचं असते. त्यामुळे, काँग्रेसने डोनेट फॉर देश या मोहिमेंतर्गत १८ डिसेंबरपासून क्राऊड फंडीगची मोहिम सुरू केली होती. विशेष म्हणजे पक्षाच्या सभांमधील खुर्च्यांनादेखील बारकोड चिकटविले होते. सोशल मीडियावरून आवाहन केले जात होते. एवढे करूनही काँग्रेसकडे फक्त ११ कोटी रुपयेच जमल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी होते. आता, काँग्रेसच्या या मोहिमेत सहभागी होत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपलं योगदान दिलं आहे. 

काँग्रेसच्या क्राऊड फंडिंगला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हायकमांडचा हिरमोड झाला. कमी प्रमाणावर देणगी जमा झाल्याने हायकमांडने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कार्यकर्ते आणि नेत्यांना प्रयत्न वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन आठवड्यांत ११ कोटी रुपयांची देणगी पुरेशी नसल्याचे राहुल गांधी, खर्गे आणि प्रियंका गांधी यांचे मत आहे. आणखी मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न वाढवायला हवेत अशा सूचनाही या नेत्यांनी संबंधितांना दिल्याचे समजते. 

काँग्रेस पक्षाने केलेल्या आर्थिक मदतीच्या या आवाहनास प्रतिसाद देत काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधी देऊ केला आहे. स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, त्यांनी काँग्रेसला १ लाख ३८,००० रुपयांची देणगी दिली आहे.

देशाच्या लोकशाहीचं रक्षण करुयात, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मदत काँग्रेस पक्षाला केली आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराची साधनसामुग्री जमविण्यासाठी काँग्रेसने १८ डिसेंबरला 'देशासाठी देणगी' मोहिम सुरु केली होती. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी १.३८ लाख रुपये देणगी देऊन पक्षाच्या ऑनलाइन क्राउडफंडिंग कार्यक्रमाची सुरुवात केली होती. त्यानंतर, देशभरातून काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी देणगी स्वरुपात निधी दिला. मात्र, तो अपेक्षेपेक्षा कमीच जमा झाला. आता, पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेसच्या अध्यक्षांएवढीच १.३८ लाख रुपये देणगी म्हणून दिले आहेत.

काँग्रेसने केलं होतं आवाहन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी ऑनलाइन देणग्या गोळा करण्यासाठी काँग्रेसने 'डोनेट फॉर देश' नावाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, १८ डिसेंबरला या मोहिमेची सुरुवात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करणार आहेत. दरम्यान, २८ डिसेंबरला आपल्या स्थापना दिनापूर्वी देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस लोकांना या मोहिमेद्वारे १३८ रुपये, १३८० रुपये, १३,८०० किंवा १० पट रक्कम देणगी म्हणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

Web Title: Prithviraj Chavan gave a hand of financial help to Congress, this much lakhs rupees of donate for desh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.