Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंसाठी अमित शाह यांचं मराठीतून ट्विट; नरेंद्र मोदींनीही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 14:40 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. राज्यातील इतर राजकीय नेते देखील एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तळागाळातील कष्टाळू नेता...महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ते अनेक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही संपूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने राज्याच्या प्रगती आणि विकासाला गती देण्यासाठी कार्य करत आहात. तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असं अमित शाह म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात रात्री कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ठाण्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बँनर लागले आहेत. काही ठिकाणी बॅनरवर भेटला विठ्ठल असे लिहले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :एकनाथ शिंदेनरेंद्र मोदीअमित शाह