लोकसभा निवडणुकीतील लोकप्रिय घोषणा, तू कितीबी ताण... ए लाव रे तो व्हीडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 04:50 PM2019-04-25T16:50:55+5:302019-04-25T16:52:17+5:30

लोकसभा निवडणुकीतील लोकप्रिय घोषणा, ए लाव रे तो व्हीडिओ...

Popular announcement of the Lok Sabha elections, A wave ray video, political party famous slogan | लोकसभा निवडणुकीतील लोकप्रिय घोषणा, तू कितीबी ताण... ए लाव रे तो व्हीडिओ...

लोकसभा निवडणुकीतील लोकप्रिय घोषणा, तू कितीबी ताण... ए लाव रे तो व्हीडिओ...

googlenewsNext

मुंबई - निवडणूक म्हटलं की प्रचार, आपल्या नेत्यांचे प्रमोशन, नेत्यांची महती, घोषणा आणि घोषवाक्यांचा भडीमार असंच काही असत. गल्लीपासून दिल्लीपासून प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांसाठी प्रचाराची रणनिती ठरलेली असते. ताई-माई आक्कापासून ते देश का नेता कैसा हो... पर्यंत घोषवाक्यांची चलती सर्वत्र पाहायला मिळते. यंदाही लोकसभा निवडणुकांमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेगेवगळ्या घोषणा लक्षणीय ठरत आहेत. 

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामध्ये मराठवाड, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण-मुंबई असा टप्पा आहे. या निवडणुकीत प्रत्येक भागातील नेत्यांच्या नावावरुन, तेथील भाषेच्या धाटणीवरुन काही महत्वपूर्ण आणि नव्या घोषणा ऐकायला मिळत आहेत. या घोषणा लक्षवेधी आणि लोकप्रियही ठरत आहेत. 

यंदाच्या निवडणुकीतील लोकप्रिय घोषणा...

ए लाव रे तो व्हीडिओ ( मनसे अध्यक्ष राज ठाकरे )
कांचनताई कुल, सुप्रियाची बत्ती गुल ( बारामती मतदारसंघ )
कितीपण आपट-दिल्लीत बापट ( पुणे मतदारसंघ )
पुण्याची खुशी - मोहन जोशी ( पुणे मतदारसंघ )
धनुष्य नाही - मनुष्य पाहा ( शिरुर मतदारसंघ )
तुम्हाला बाण पाहिजे की खान पाहिजे ( शिवसेना )
एकच फॅक्टर- अमोल कोल्हे डॉक्टर ( शिरुर )
कितीबा आपट - येणार तर मोदीच ( सर्वसाधारण )
आला आला माढा, संजय मामाला पाडा ( माढा मतदारसंघ )
बस झाल्या गप्पा आता बजरंग बप्पा ( बीड )
तू किती बी ताण, येत नाही बाण ( शिवसेनासंदर्भात)
आमचं ठरलंय  ( कोल्हापूर )
खिच के ताण, येणार तर धनुष्यबाण ( शिवसेना)
सगळ्या नटांचा एकचा पाणा, निवडून आणा नवनीत राणा ( अमरावती)
शिवसेनेत नाही राहिलं बळ, म्हणून ते वापरतंय कमळ 
जय मनसे- देतो का दोनशे
एक नेता एक आवाज, उदयन महाराज उदयन महाराज
आएगा तो मोदीही  ( व्हायरल )
 

Web Title: Popular announcement of the Lok Sabha elections, A wave ray video, political party famous slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.