सकस आहाराची पाकीटे समुद्रात

By Admin | Updated: June 16, 2015 23:13 IST2015-06-16T23:13:22+5:302015-06-16T23:13:22+5:30

शासनाच्या वतीने कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी गरोदर महिला व बालकांंना वाटप करण्यात येणाऱ्या सकस आहाराची शेकडो

Poor diet packets in the sea | सकस आहाराची पाकीटे समुद्रात

सकस आहाराची पाकीटे समुद्रात

पालघर : शासनाच्या वतीने कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी गरोदर महिला व बालकांंना वाटप करण्यात येणाऱ्या सकस आहाराची शेकडो पाकीटे सातपाटी-शिरगाव समुद्राच्या किनाऱ्यावर सापडली आहेत. ही पाकीटे फेकून देण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे संबंधित यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्ह्यातील कुपोषण कसे दूर होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात आता मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
महिला बालविकास विभाग आयुक्तालय, एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून गरोदर माता व सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकाना सकस आहार पुरविला जातो. जिल्ह्यातील पूर्व भागातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदी भागात कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी विशेष लक्ष दिले जात असून सकस आहाराचे वाटप करण्यात येते.
भात, डाळ व भाकरी या नेहमीच्या आहारामधून गरोदर माता व बालकांना पुरेसा सकस आहार मिळत नसल्याने लोह, जीवनसत्व अ, कॅल्शियम, थायमिन, जीवनसत्व क आदी पोषक घटकांनी युक्त सकस आहाराचे वाटप केले जाते. पालघर व मनोर तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एकूण ६०२ अंगणवाड्यांमध्ये महालक्ष्मी महिला गृहउद्योग व बालविकास बहुउद्देशीय औद्योगिक सहकारी सोसायटी लिमिटेड नांदेड या संस्थेद्वारे ठेकापद्धतीने वितरीत केले जाते. त्यांच्या वाहनाद्वारे हा आहार पुरविला जात असल्याचे प्रकल्प अधिकारी एन. डी. वालेकर यांनी सांगितले. समुद्र किनाऱ्यावर दोन दिवसापासून ९६० ग्रॅमचा शिरा असलेली शेकडो पाकीटे आढळून आली. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी, पॉकीटावरील बॅच नंबरवरून ती कोणत्या कार्यालयाकडून फेकण्यात आली आहेत याचा छडा लागणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Poor diet packets in the sea