Join us  

...आधी नितीन गेला अन् आता सचिनही, पोलीस भावंडांचा पाठोपाठ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 9:02 PM

सचिन पाटील यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. 

ठळक मुद्देसचिन पाटील गेल्या चार दिवसांपासून ताप असल्याने ठाणे येथील गुरुनानक रुग्णालायात दाखल झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

मुंबई : विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. सचिन पाटील हे मूळचे कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातील उदगावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. 

सचिन पाटील गेल्या चार दिवसांपासून ताप असल्याने ठाणे येथील गुरुनानक रुग्णालायात दाखल झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना  श्वसनाचा त्रास होवू लागला होता. त्यानंतर प्लाझ्मा थेरपीसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले होते. पण, उपरचारादरम्यान गुरुवारी सायकांळी त्यांचा मृत्यू झाला. 

धक्कादायक बाब म्हणजे सचिन पाटील यांचे भाऊ नितीन हे देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. नाशिक इथे प्रशिक्षिण सुरु असताना त्यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता. या दोघांच्या दुर्देवी मृत्यूने पाटील कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. 

आणखी बातम्या...

Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ, पण चांदी घसरली, जाणून घ्या आजचे भाव

बिहारमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

Vikas Dubey Encounter : उमा भारती म्हणाल्या, "मारेकरी ठार झाला, पण तीन गोष्टी रहस्यमय"

'एक शरद अन् शिवसेना गारद', पवारांच्या मुलाखतीवरून नारायण राणेंचा टोला

मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे

CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस