‘गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन फोटोग्राफरने केले’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 07:45 IST2025-04-02T07:44:36+5:302025-04-02T07:45:05+5:30
Court News: वेगवेगळ्या योजनांकरिता राज्य सरकारने आणि राजकीय पक्षांनी आपला फोटो वापरून गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, महाराष्ट्र, तेलंगणा किंवा राजकीय पक्षांनी चूक केली नसून ही ‘चूक’ फोटोग्राफरची आहे.

‘गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन फोटोग्राफरने केले’
मुंबई - वेगवेगळ्या योजनांकरिता राज्य सरकारने आणि राजकीय पक्षांनी आपला फोटो वापरून गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, महाराष्ट्र, तेलंगणा किंवा राजकीय पक्षांनी चूक केली नसून ही ‘चूक’ फोटोग्राफरची आहे. त्याने तिच्या परवानगीशिवाय हे फोटो अमेरिकास्थित ‘शटरस्टॉक’ या वेबसाइटवर अपलोड केले.
फोटोग्राफर तुकाराम कर्वे यांनी नम्रता कवळे यांचे फोटो ‘शटरस्टॉक’च्या अटी आणि शर्ती न वाचताच अपलोड केले. त्यामध्ये स्पष्ट म्हटले होते की, हे फोटो व्यावसायिक हेतूसाठी वापरले जातील, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने म्हटले.