Fuel Price: मुंबईत 'या' दिवशी पेट्रोल मिळणार 4 रुपयांनी स्वस्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 18:45 IST2018-05-30T18:44:18+5:302018-05-30T18:45:00+5:30
दिवसेंदिवस वाढणा-या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने हैराण असलेल्या मुंबईतील सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिलासा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून मुंबईतील दुचाकी चालकांना पेट्रोल प्रतिलिटर 4 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

Fuel Price: मुंबईत 'या' दिवशी पेट्रोल मिळणार 4 रुपयांनी स्वस्त...
मुंबई : दिवसेंदिवस वाढणा-या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने हैराण असलेल्या मुंबईतील सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिलासा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून मुंबईतील दुचाकी चालकांना पेट्रोल प्रतिलिटर 4 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस येत्या 14 जून रोजी आहे. या दिवशी मुंबईतील 36 पेट्रोलपंपावर दुचाकी चालकांना पेट्रोलवर प्रतिलिटर 4 रुपयांची सूट मिळणार आहे.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. यातच मनसे सरकारमध्ये नसूनही स्वस्तात पेट्रोल देत आहे, तर केंद्र आणि राज्यातही भाजपाचे सरकार असून सुद्धा त्यांना पेट्रोलचे दर का कमी करता येत नाहीत, असा सवालही मनसेकडून करण्यात येत आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 29, 2018