प्रशांत ठाकुरांच्या प्रचारात युथ ब्रिगेडचा सहभाग

By Admin | Published: October 3, 2014 10:41 PM2014-10-03T22:41:11+5:302014-10-03T22:41:11+5:30

पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराची धुरा युथ ब्रिगेडने खांद्यावर घेतली आहे.

Participation of Youth Brigade in Prashant Thakur's campaign | प्रशांत ठाकुरांच्या प्रचारात युथ ब्रिगेडचा सहभाग

प्रशांत ठाकुरांच्या प्रचारात युथ ब्रिगेडचा सहभाग

googlenewsNext
>पनवेल :  पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराची धुरा युथ ब्रिगेडने खांद्यावर घेतली आहे. शहरी भागात अनेक ठिकाणी युथ रॅली काढून तरुणांना आकर्षित करण्यात येत आहे. या रॅलीला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ती पाहण्यासाठीही गर्दी होत आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात 91 टक्के मतदार हे 18 ते 4क् या वयोगटातील आहेत. युवा मतदार हे पनवेलचा आमदार ठरणार असून युथ उमेदवारालाच पसंती मिळणार आहे. प्रशांत ठाकूर काँग्रेसमध्ये असताना सुमारे दहा वर्ष रायगड जिल्हा युवक काँग्रेसची जबाबदारी सांभाळली. त्यांनी युवकांना पक्षाशी जोडून ताकद आणि प्रभाव वाढवला याची दखल थेट दिल्ली दरबारी घेण्यात आली होती. म्हणून मागील निवडणुकीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रशांत ठाकूर यांना तिकीट दिलेच त्याचबरोबर त्यांच्यासाठी महाराष्ट्रात पहिली सभा घेतली. 
ठाकूर हे केवळ पनवेलचेच नाही तर महाराष्ट्राचे नेतृत्व करतील, असे भाकित त्यांनी वर्तवले होते. त्यानुसार गेली पाच वर्ष आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात त्यांनी विकास  कामे केलीच त्याचबरोबर राज्याशी संबंधित असलेले अनेक प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडली. शुल्कवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाला त्यांनी भाग पाडले. स्थानिकांच्या टोलमाफीसाठी  ते थेट रस्त्यावर उतरले, निर्णय झाला नाही म्हणून काँग्रेस  पक्षात भविष्य असतानाही त्यांनी रामराम ठोकला. त्यामुळे युवक त्यांच्याकडे अधिक आकर्षित झाले आहेत. (वार्ताहर)
 
युवा कार्यकत्र्याची फळी
4युवा नेते परेश ठाकूर यांच्यासह सुरेश सावंत, नगरसेवक संतोष शेट्टी, पंचायत समितीचे सदस्य निलेश पाटील, किशोर चौथमोल,सदानंद पाटील, अविनाश पाटील, सचिन गायकवाड, मयुरेश नेटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रचारात अग्रभागी आहेत.
 
प्रचाराला चाललो आम्ही
4अनेक सामाजिक, शैक्षणिक, वाहतूक संघटनांनी प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेचाही समावेश आहे. काल झालेल्या प्रचार रॅलीत अनेक स्कूल व्हॅन भाजपाचे झेंडे लावून सहभागी झाले होते. 
4दररोज विद्याथ्र्याना शाळेत घेऊन जाणा:या व्हॅन गुरुवारी गांधी जयंती असल्याने निवांत होत्या. त्यामुळे चालक आणि मालकांनी प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Participation of Youth Brigade in Prashant Thakur's campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.