Join us  

"बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 3:08 PM

बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची आणि ऑनलाईन महाजालातील बालकांच्या लैंगिक विषयाशी संबंधित बाबींना कायद्याच्या चौकटीत आणण्याची आवश्यकता आहे, असे मत  महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

मुंबई - बालकांचे ऑनलाईन लैंगिक शोषण हा अतिशय संवेदनशील विषय असून याबाबत सर्वांनी एकत्रितरित्या काम करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे  बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची आणि ऑनलाईन महाजालातील बालकांच्या लैंगिक विषयाशी संबंधित बाबींना कायद्याच्या चौकटीत आणण्याची आवश्यकता आहे, असे मत  महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

'महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग' आणि 'इंटरनॅशनल जस्टीस मिशन' यांच्या संयुक्त विद्यमाने 'बालकांचा ऑनलाईन पद्धतीने होणारा लैंगिक छळ थांबविण्यासाठी धोरणात्मक बाबींची अंमलबजावणी' या विषयावर बुधवारी  राष्ट्रीय स्तरावर वेबिनारचे(ऑनलाईन चर्चासत्र)आयोजन केले होते . त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या,' इंटरनेटमुळे सर्व जग जवळ आणले आहे. इंटरनेटमुळे अनेक क्षेत्रात सकारात्मक क्रांती घडून आली आहे. मात्र, काही विकृत मनोवृत्ती त्याचा गैरवापरदेखील करत आहेत. बालकांचे होणारे ऑनलाईन शोषण ही देखील अशीच काळी बाजू त्याला रोखणे हे आपल्यापुढील आव्हान आहे. त्यासाठी केंद्रीय तसेच सर्व राज्यांच्या सर्व संबंधित संस्था आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय तसेच अन्य अशासकीय संस्थांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत.

 

आयोगाच्या सचिव श्रीमती सीमा व्यास यांनी या विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यावर भर दिला. स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्नातून त्यासाठी महत्वाचे ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या संचालक  मेलिसा वालावलकर यांनी प्रास्ताविक करताना सद्यस्थितीतील टाळेबंदी संपल्यानंतर या विषया संबंधाने करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. राष्ट्रीय वेबिनार चर्चासत्रांमध्ये  'इंटरनॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रेनचे संचालक, लॉ एन्फोर्समेंट ट्रेनिंग अँड टेक्नॉलॉजी गुलेरमो गलारझा, केरळचे अपर पोलीस महासंचालक व केरळ पोलीस सायबरडोमचे नोडल अधिकारी मनोज अब्राहम, फेसबूक इंडियाचे हेड, ट्रस्ट अँड सेफ्टी सत्या यादव,बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टीपीडब्ल्यूसी इंडियाचे कार्यकारी संचालक कृष्ण शास्त्री पांडीयल या विविध क्षेत्रातील वक्त्यांनी विषयाच्या अनुषंगाने मते मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!

CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! 1500 भारतीयांवर WHO 'या' औषधांची चाचणी करणार

CoronaVirus News : लॉकडाऊनचा असाही फायदा; 40 वर्षांत जे झालं नाही ते घडलं, तुम्हीही म्हणाल अरे व्वा!

CoronaVirus News : ...म्हणून वकील आता दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

CoronaVirus News : टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! गावाकडे निघालेल्या 8 मजुरांचा मृत्यू, 50 जण जखमी

शाओमीचे सीईओ कोणता फोन वापरतात माहित्येय?; नेटकऱ्यांनी एका पोस्टमधून काढलं शोधून

CoronaVirus News : 'झिंक आणि गरम पाण्याने कोरोनाग्रस्त बरे झाले', डॉक्टरचा दावा

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेलं 'Y2K' नेमकं आहे तरी काय?

 

टॅग्स :यशोमती ठाकूरमुंबईगुन्हेगारीमहाराष्ट्रइंटरनेट