मुंबईत २८१ पैकी ७५ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरियंट, डोस न घेणाऱ्या चार रुग्णांचा मृत्यू....  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 08:20 PM2021-11-12T20:20:09+5:302021-11-12T20:20:15+5:30

मुंबई - पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सुरु असलेल्या नेक्स्ट जनरेशन सिक्वेसिंग प्रयोगशाळेत आतापर्यंत तीन तुकड्यांमध्ये चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील ...

Out of 281 patients in Mumbai 75% infected with delta variant, four patients who did not take dose died | मुंबईत २८१ पैकी ७५ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरियंट, डोस न घेणाऱ्या चार रुग्णांचा मृत्यू....  

मुंबईत २८१ पैकी ७५ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरियंट, डोस न घेणाऱ्या चार रुग्णांचा मृत्यू....  

Next

मुंबईपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सुरु असलेल्या नेक्स्ट जनरेशन सिक्वेसिंग प्रयोगशाळेत आतापर्यंत तीन तुकड्यांमध्ये चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील २८१ रुग्णांमधील कोविड नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये डेल्टा व्हेरिअंटचे ७५  टक्के, डेल्टा डेरिव्हेटीव्हचे २५ टक्के रुग्ण आढळले आहेत. यापैकी मृत्युमुखी पडलेले व ६० वर्षांवरील चारही रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतला नव्हता. तर लस घेतलेल्या बाधित रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे आढळून आले आहे. त्यामुळे कोविड लस घेणाऱ्यांना व प्रतिबंधक नियम पाळणाऱ्यांना विषाणू बाधेपासून संरक्षण मिळते. तसेच कोरोना झाला तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते, असा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे.  

महापालिकेने केलेल्या चाचणीत मुंबईतील २८१ रुग्णांपैकी नऊ टक्के रुग्ण ० ते २० वर्षे या वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ३० टक्के, ४१ ते ६० वर्षे वयोगटात ३४ टक्के, ६१ ते ८० वयोगटात २३ टक्के आणि ८१ ते १०० वयोगटातील तीन टक्के रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. या चाचणीतल निष्कर्षद्वारे २८१ पैकी २१० रुग्ण म्हणजेच ७५ टक्के हे डेल्टा व्हेरिअंट तर २५ टक्के हे डेल्टा डेरिव्हेटीव्ह प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सौम्य त्रासदायक विषाणू... 

डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक आहेत. यामुळे गंभीर धोकाही उदभवत नाही. तर डेल्टा डेरिव्हेटिव्ह विषाणूच्या प्रसाराचा वेगही कमी आहे. त्यामुळे योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. चाचणी झालेल्या २८१ पैकी पहिला डोस घेतलेल्या आठजणांना आणि दोन्ही डोस घेतलेल्या २१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी कोणाचाही मृत्यू झालेला नाही, तसेच अतिदक्षता उपचाराचीही गरज भासली नसल्याचे समोर आले. 

डोस न घेणाऱ्या चार रुग्णांचा मृत्यू....  

एकही डोस न घेतलेल्या ६९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील १२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर चारजणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू ओढवलेले चारही रुग्ण ६० वर्षांवरील होते. यापैकी दोघांना दीर्घकालीन आजार होते. त्यामुळे लस घेणे हे किती सुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तर १८ वर्षापेक्षा कमी वयोगटाचा विचार करता ११ जणांना डेल्टा व्हेरिअंट आणि आठजणांना डेल्टा डेरिव्हेटीव्ह प्रकाराची कोविड लागण झाल्याचे सामोरे आले. त्यामुळे बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Web Title: Out of 281 patients in Mumbai 75% infected with delta variant, four patients who did not take dose died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.