आमच्या पंतप्रधानांची जगभरात फेकू अशीच ओळख, करा इंटरनेटवर सर्च- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 20:48 IST2019-04-06T20:47:42+5:302019-04-06T20:48:02+5:30
आमच्या पंतप्रधानांची जगभरात फेकू अशीच ओळख आहे,

आमच्या पंतप्रधानांची जगभरात फेकू अशीच ओळख, करा इंटरनेटवर सर्च- राज ठाकरे
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या बोलघेवड्यापणावर टीका केली आहे. आमच्या पंतप्रधानांची जगभरात फेकू अशीच ओळख आहे, इंटरनेटवर फेकू शब्द टाईप केला तर मोदींच नाव येतं. ही माझ्या पंतप्रधानांची इमेज जगभरात आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. इंदिरा गांधींनंतर 30 वर्षांनी एका पक्षाला या देशात बहुमत मिळालं. भारताचं पंतप्रधान होण्यासाठी अनेकांची हयात गेली.
लालकृष्ण अडवाणींनी सत्तेपर्यंत पक्ष आणला, त्यांनाही पंतप्रधान व्हायचे होते, पण नाही होऊ शकले. नरेंद्र मोदी या माणसाला ही सगळी संधी मिळाली, पण तरीही हा माणूस देशाशी खोटं बोलत राहिला. गेल्या पाच वर्षांत या माणसानं पत्रकार परिषद घेतलेली नाही. आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं नाही, म्हणूनच पत्रकारांना हा माणूस सामोरं गेला नाही. मी रतन टाटांच्या सांगण्यावरून त्यावेळी गुजरातला गेलो, तिथे मला जे जे दाखवलं त्यावरून मी माझं मत बनवलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की मला तेवढंच दाखवलं गेलं जेवढं दाखवयाच्या लायकीचं होतं.
राहुल गांधी म्हणाले तसे ह्या मोदींनी खूप काही शिकवलं. मला कोणाच्या खाजगी आयुष्यात जायचं नाही पण नरेंद्र मोदी वर्षातून एकदा आईला भेटायला जातात त्यावेळी मीडियाला घेऊन का जायचं? नोटबंदीच्या वेळेला स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं. भावनिक राजकारण करायचं म्हणून कुठल्या थरापर्यंत जाणार तुम्ही? ह्यातून मोदींचा दृष्टिकोन कळतो. नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्याच्या आधी ज्याला ज्याला विरोध केला त्या त्या गोष्टी त्यांनी सत्तेत राबवल्या.