दादरमध्ये अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू, मनपावर हलगर्जीपणाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 07:53 IST2018-04-20T07:40:02+5:302018-04-20T07:53:14+5:30
दादर परिसरात अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

दादरमध्ये अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू, मनपावर हलगर्जीपणाचा आरोप
मुंबई - दादर परिसरात अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिशेन सांगळे (38 वर्षीय) नावाच्या व्यक्तीच्या अंगावर झाड पडले. या घटनेत दिनेश सांगळे यांना गंभीर इजा झाली. त्यांना तातडीनं केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दिशेश सांगळे यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मनपाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)