आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:13 IST2025-06-11T18:12:48+5:302025-06-11T18:13:24+5:30

या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँडच चालणार असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे.

Now only the Thackeray brand will work! For the first time, uncle Raj Thackeray and nephew Aaditya Thackeray appeared on the same banner outside Shiv Sena Bhavan | आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले

आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात दोन्ही बाजूने मिळणारा प्रतिसाद पाहून ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी विविध शहरात बॅनर्स झळकत आहे. परंतु शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच ठाकरे काका-पुतण्याचा एकत्र बॅनर झळकला आहे.

येत्या १३ जून रोजी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर १४ जून रोजी काका राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त दादरच्या शिवसेना भवन परिसरात उद्धव ठाकरे गटाच्या युवासेनेकडून बॅनर लावण्यात आले आहेत. त्यात विशेषत: राज ठाकरेंचा आणि आदित्य ठाकरेंचा फोटो आहे. या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँडच चालणार असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी भविष्यकाळातील हे मनोमिलनाचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

पुण्यातही झळकला बॅनर

गिरीश गायकवाड या पुण्यातील शिवसैनिकाने स्वारगेट परिसरात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर पुण्यातल्या शिवसैनिकांची भावनिक साद दिल्याचे या बॅनरच्या माध्यमातून दिसून आले. 

"जे महाराष्ट्राच्या मनात तेच होईल"

दरम्यान, मनसेने साद दिली आहे, त्याला प्रतिसाद कधी देणार? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले होते की,  ‘जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. मी तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यांच्याही सैनिकांच्या मनात संभ्रम नाही. आमचे कार्यकर्ते संपर्कात आहेत. उद्धव यांच्या या विधानामुळे आता काय होते, याची उत्सुकता आहे. 

Web Title: Now only the Thackeray brand will work! For the first time, uncle Raj Thackeray and nephew Aaditya Thackeray appeared on the same banner outside Shiv Sena Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.