उत्तर मुंबईत पायाभूत अन् आरोग्य सेवांवर भर देणार; पीयूष गोयल यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 12:44 IST2024-05-12T12:44:09+5:302024-05-12T12:44:58+5:30
येत्या काळात त्यात आणखी नव्या योजनांची भर पडणार आहे, असे पीयूष गोयल म्हणाले.

उत्तर मुंबईत पायाभूत अन् आरोग्य सेवांवर भर देणार; पीयूष गोयल यांचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पायाभूत आणि आरोग्य सेवांवर भर देत अनेक अद्ययावत सुविधा दिल्या जाणार असल्याचे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघातील महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी दिले. कांदिवली (पूर्व) येथील गौतम नगर येथून जन आशीर्वाद रथासह सुरू झालेल्या नमो यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी पीयूष गोयल बोलत होते.
उत्तर मुंबईची उत्तम मुंबई करण्याचा संकल्प मी केला आहे. सर्वच क्षेत्रांत अनेक नवनव्या सुधारणा करण्याचा आमचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या अनेक योजनांचा लाभदायी अनुभव नागरिकांनी घेतला आहे. येत्या काळात त्यात आणखी नव्या योजनांची भर पडणार आहे, असे पीयूष गोयल म्हणाले.
यावेळी नमो यात्रेत खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते. दरम्यान, ‘जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे’ असे लिहिलेले फलक लक्ष वेधून घेत होते.