माझ्या एकाही ट्विटमुळे हिंसाचार झाला नाही, कंगना रनाैतचा उच्च न्यायालयात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 05:23 AM2021-02-16T05:23:05+5:302021-02-16T07:02:48+5:30

Kangana Ranaut claims in the High Court : कंगनाने ट्विटद्वारे काहीच चुकीचे केले नाही, असे कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितले.

None of my tweets caused violence, Kangana Ranaut claims in the High Court | माझ्या एकाही ट्विटमुळे हिंसाचार झाला नाही, कंगना रनाैतचा उच्च न्यायालयात दावा

माझ्या एकाही ट्विटमुळे हिंसाचार झाला नाही, कंगना रनाैतचा उच्च न्यायालयात दावा

Next

मुंबई : माझ्या एकाही ट्विटमुळे हिंसाचार झाला नाही किंवा कोणताही गुन्हा घडलेला नाही, असे दावा करत अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलिसांनी या प्रकरणी नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, अशी विनंती उच्च न्यायालयाला सोमवारी केली. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी ठेवत कंगना व तिची बहीण रंगोली यांना दिलेले अंतरिम संरक्षण तोपर्यंत कायम ठेवले.
कंगनाने ट्विटद्वारे काहीच चुकीचे केले नाही, असे कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितले. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने गुन्हा नोंदविण्याचे दिलेले आदेश अयोग्य असल्याने त्यांचा आदेश व पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, अशी विनंती सिद्दिकींनी न्यायालयाला केली.
गुन्हा नोंदविण्याचा आदेश देताना वांद्रे न्यायालयाने सारासार विचार केला नाही. जे कलम लावण्यात आले आहे, त्याअंतर्गत कोणताच गुन्हा केलेला नाही. माझ्या ट्विटरवर लोकांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्याचे हिंसाचारात रूपांतर झाले नाही. त्यामुळे मला कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही, असे सिद्दिकी यांनी कंगनाच्या वतीने न्यायालयाला सांगितले.
वांद्रे दंडाधिकाऱ्यांनी कंगना व तिची बहीण रंगोली हिच्याविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोघींना समन्स बजावले. या कार्यवाहीला दोघींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
व्यवसायाने वकील असलेल्या मुनावर अली सय्यद याने कंगना व रंगोलीने ट्विट करून दोन समाजांत द्वेष पसरवत असल्याची तक्रार वांद्रे न्यायालयात केली.

जावेद अख्तर मानहानी प्रकरण : कंगनाला १ मार्च रोजी हजर राहण्याचे अंधेरी दंडाधिकाऱ्यांचे आदेश
गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानी दाव्यासंबंधी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला समन्स बजावले. न्यायालयाने १ मार्च रोजी कंगनाला न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने जुहू पोलिसांना याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जुहू पोलिसांनी सोमवारी न्यायालयात अहवाल सादर केला आणि या अहवालानंतर पोलिसांनी कंगना हिला १ मार्च रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

Web Title: None of my tweets caused violence, Kangana Ranaut claims in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.