लसीकरणामुळे टळतो डेल्टाने होणारा मृत्यू; ९९ टक्क्यांपर्यंत संरक्षण, एनआयव्हीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 06:16 AM2021-07-18T06:16:11+5:302021-07-18T06:16:57+5:30

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला विषाणूचा ‘डेल्टा’ प्रकार प्रामुख्याने कारणीभूत ठरला होता. लस घेतलेल्यांनाही विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.

niv claims vaccination prevents delta deaths and give protection up to 99 percent | लसीकरणामुळे टळतो डेल्टाने होणारा मृत्यू; ९९ टक्क्यांपर्यंत संरक्षण, एनआयव्हीचा दावा

लसीकरणामुळे टळतो डेल्टाने होणारा मृत्यू; ९९ टक्क्यांपर्यंत संरक्षण, एनआयव्हीचा दावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला विषाणूचा ‘डेल्टा’ प्रकार प्रामुख्याने कारणीभूत ठरला होता. लस घेतलेल्यांनाही विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. मात्र, लसीमुळे मृत्यूचा धोका ९९ टक्क्यांनी कमी होतो, असा निष्कर्ष पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेने (एनआयव्ही) एका अभ्यासातून काढला आहे. ‘एनआयव्ही’ने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि पश्चिम बंगालसह काही राज्यांमधून रुग्णांचे नमुने गोळा केले होते. त्यातील बहुतांश रुग्णांमध्ये डेल्टा विषाणू आढळला. याशिवाय काही नमुन्यांमध्ये अल्फा,  कॅप्पा तसेच डेल्टा प्लस प्रकारही आढळले. दुसऱ्या लाटेमागे डेल्टा विषाणू कारणीभूत असल्याचा निष्कर्ष ‘एनआयव्ही’ने केलेल्या अभ्यासानंतर काढला आहे. हा विषाणू सर्वप्रथम विदर्भात आढळला हाेता. त्यानंतर अनेक देशांमध्ये या विषाणूचा झपाट्याने प्रसार झाला. संसर्ग क्षमता खूप जास्त असल्यामुळेच डेल्टा विषाणूचा संसर्ग लस घेतलेल्यांना झाला, असे ‘एनआयव्ही’ने म्हटले आहे. 

अनेक देशांमध्ये लस घेणाऱ्यांना संसर्ग झाल्याचे आढळले. मात्र, लसीकरणामुळे ब्रिटन, कॅनडा आणि इस्रायलमध्ये गंभीर आजार, रुग्णालयात दाखल हाेणे तसेच मृत्यूचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे. लसीकरणानंतर हाेणाऱ्या संसर्गाकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे लसींमध्ये बदल करून नव्या प्रकारांविराेधात संरक्षण उभे करता येईल, असे ‘एनआयव्ही’च्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

लसींनी रोखले मृत्यू

डेल्टा विषाणूमध्ये संसर्गक्षमता प्रचंड असली तरीही मृत्यू रोखण्यासाठी लसीकरणामुळे ९९ टक्के संरक्षण मिळत असल्याचे हा अभ्यास करणारे डॉ. यादव यांनी सांगितले. 

लस घेणाऱ्यांनाही डेल्टाचा संसर्ग 

लसीकरणानंतरही संसर्ग झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये डेल्टा विषाणू आढळला. मात्र, केवळ ९.८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. महत्त्वाचे म्हणजे ०.४ टक्के मृत्यूदर आढळला. त्यामुळे मृत्यू आणि रुग्णालयात दाखल हाेण्याचे प्रमाण लसीकरणामुळे घटल्याचा निष्कर्ष अभ्यासातून आढण्यात आला.

Web Title: niv claims vaccination prevents delta deaths and give protection up to 99 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.