राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शहीद विजय साळसकरांच्या मातोश्रींची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:03 PM2018-11-26T22:03:50+5:302018-11-26T22:03:53+5:30

मुंबईत २६/११ रोजी झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये पोलिसांसह अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला होता.

NCP State President Jayant Patil visited the meeting of Shaheed Vijay Salaskar's Matoshri | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शहीद विजय साळसकरांच्या मातोश्रींची घेतली भेट

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शहीद विजय साळसकरांच्या मातोश्रींची घेतली भेट

Next

मुंबई- मुंबईत २६/११ रोजी झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये पोलिसांसह अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला होता. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी शहीद विजय साळसकर यांनी देखील आपल्या प्राणाची आहुती दिली होती.

या घटनेला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने त्यांच्या मालाड पश्चिम चिंचोली बंदर येथील निवासस्थानी जाऊन शहीद साळसकर यांच्या मातोश्रीं हेमलता साळसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे उपस्थित होते. तसेच मालाड पूर्व कुरार येथे झालेल्या एका कार्यक्रमात आज अजित रावराणे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत २६/११ रोजी झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद तसेच पोलिसांसह अनेक निष्पापांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Web Title: NCP State President Jayant Patil visited the meeting of Shaheed Vijay Salaskar's Matoshri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.