NCP leader Rohit Pawar has reacted to Minister Jayant Patil's desire to become Chief Minister | 'त्यांनी मतदारसंघात चांगलं काम केलं आहे'; जयंत पाटलांच्या इच्छेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

'त्यांनी मतदारसंघात चांगलं काम केलं आहे'; जयंत पाटलांच्या इच्छेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'के न्यूज इस्लामपूर' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी जयंत पाटील यांनी ही इच्छा बोलावून दाखवली आहे. 

जयंत पाटील या मुलाखतीत म्हणाले की, आमच्या पक्षाकडे (राष्ट्रवादीकडे) अजून मुख्यमंत्रिपद आलेलं नाही. यावर तुमची इच्छा आहे का, असा सवाल जयंत पाटील यांना मुलाखतीत विचारण्यात आला. दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही वाटणं स्वाभाविक आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतील, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. 

जयंत पाटील या मुलाखतीत म्हणाले की, आमच्या पक्षाकडे (राष्ट्रवादीकडे) अजून मुख्यमंत्रिपद आलेलं नाही. यावर तुमची इच्छा आहे का, असा सवाल जयंत पाटील यांना मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नावर मलाही मुख्यमंत्री व्हावं, असं वाटणारच. मात्र अंतिम निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतील, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्रिपद मिळावं ही पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा असते. माझ्यासोबत मतदारांना देखील आपण मुख्यमंत्री बनावं, अशी इच्छा असेल, असं जयंत पाटील यांनी सांगितले.

परंतु सध्याची परिस्थिती आणि पक्षाच्या आमदारांची संख्या पाहता हे शक्य नाही. आम्हाला आमदारांची संख्या वाढवावी, लागेल. पक्ष संघटना मजबूत करावं लागेल, असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.  पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. 

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. काम करताना ताकद मिळावी. मंत्री म्हणून असताना ती ताकद असावी. तसेच मुख्यमंत्री असताना मोठी ताकद मिळते. त्याचा हेतू जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा असतो. जयंत पाटलांचा देखील लोकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा हेतू असावा. त्यामुळे त्यांनी असं विधान केलं आहे. जयंत पाटील अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात खूप चांगलं काम केलं आहे, असं रोहित पवार यांनी सांगितले. 

मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रावादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते- जयंत पाटील

मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रावादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे किंवा अजित पवार या दोघांपैकी एकाला पाठींबा देण्याची वेळ आल्यास कोणाला पाठींबा देणार या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, "मुळात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना वेगवेगळं समजणं चुकीचं ठरेल. ते एकाच घरातील आहेत''

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: NCP leader Rohit Pawar has reacted to Minister Jayant Patil's desire to become Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.