सुनेबाबत विद्या चव्हाणांचं धक्कादायक विधान, स्वत:वरील आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 11:52 AM2020-03-03T11:52:44+5:302020-03-03T12:53:58+5:30

पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेनं

ncp leader MLA Vidya Chavan's shocking statement about her doughtier in law, reject alligation of crime MMG | सुनेबाबत विद्या चव्हाणांचं धक्कादायक विधान, स्वत:वरील आरोप फेटाळले

सुनेबाबत विद्या चव्हाणांचं धक्कादायक विधान, स्वत:वरील आरोप फेटाळले

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, विद्या चव्हाण यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. याउलट त्यांच्या सुनेवरच गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी केले आहेत. 

राज्यातील विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित (पीडितेचा पती), मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल चव्हाण (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला नेत्या असलेल्या विद्या चव्हाणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विलेपार्ले पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच विद्या चव्हाण यांनी आपल्यासह कुटुंबीयांविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. 

माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा धक्कादायक गौप्यस्फोट विद्या चव्हाण यांनी केला आहे. सुनेच्या मोबाइलमधील चॅट आणि इतर बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलाने यासंदर्भात पुरावे गोळा केले आणि त्याने घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्क साधला. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे याबाबत मी जास्त बोलणार नाही, अशी प्रतिक्रियाही विद्या चव्हाण यांनी दिली.
'नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आलं आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलीला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. त्यामुळे मुलाला दुसरीही मुलगी झाली म्हणून माझ्यावर करण्यात आलेले हे आरोप चुकीचे आहेत. मी कायम महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं असून कायदा दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा गैरवापरही करण्यात येऊ शकतो. कायद्याचा कुणी चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी. कायदेशीर मार्गानं हा लढा सुरूच राहिल', असेही त्यांनी सांगितलं.

पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेनं 16 जानेवारीला तक्रार दिली होती. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आणि इतर सदस्यांविरोधात कलम 498 ए, 354, 323, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विद्या चव्हाणांसह कुटुंबीय सुनेचा छळ करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. पीडितेला पहिली मुलगी आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा मुलगीच झाल्यानंच विद्या चव्हाण कुटुंबीय पीडितेचा छळ करत होते. पीडित मुलीने विद्या चव्हाण यांच्या घरी ठेवलेल्या तिच्या मौल्यवान वस्तूंचीही मागणी केली आहे. विशेष म्हणजे महिलांवर अन्याय झाल्यावर तत्परतेने पुढे येणाऱ्या विद्या चव्हाण याच सुनेचा छळ करत असल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 

Web Title: ncp leader MLA Vidya Chavan's shocking statement about her doughtier in law, reject alligation of crime MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.