Join us  

Video - 'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांचं मोदींवर गाण्यातून टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 1:26 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींवर आव्हाड यांनी यावेळी एका गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 'सावन का महिना पवन करे शोर' या मिलन चित्रपटातील गाण्याच्या चालीवर 'चुनाव का महिना' हे गाणं गायलं आहे.फिल्मी स्टाइलमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन मोदींवर निशाणा साधला आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींवर आव्हाड यांनी यावेळी एका गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: गाणं गात पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. 'सावन का महिना पवन करे शोर' या मिलन चित्रपटातील गाण्याच्या चालीवर 'चुनाव का महिना' हे गाणं त्यांनी गायलं आहे. या गाण्याचा एक व्हिडीओ आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. 

फिल्मी स्टाइलमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'सावन का महिना पवन करे शोर' या मूळ गाण्यातील शब्दांमध्ये त्यांनी थोडा बदल करून 'चुनाव का महिना' हे नवीन गाणं तयार केलं आहे. तसेच हातात गिटार घेऊन आव्हाड यांनी गाणं गायलं आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपावर राफेल मुद्द्यावरुन त्यांनी पहिल्या कडव्यात टीका केली आहे. त्यानंतर मोदी आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तानमध्ये भेट झाली होती. त्यांच्या या भेटीवरुन आव्हाड यांनी दुसऱ्या कडव्यामध्ये मोदींना टोला लगावला आहे. तर शेवटच्या कडव्यामध्ये नोटबंदीवरुन जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. 

जितेंद्र आव्हाड यांची मोदी सरकारवर गाण्यातून टीका

'चुनाव का महिना राफेल करे शोर.. पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…अनिल को तुमने देखो काँन्ट्रॅक्ट दिलाया.. भारत की जनता को मूर्ख बनाया…अब चाहे जीतने मारो तुम सिक्स और फोर… पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…

नवाज के घर मे तुमने बिर्याणी खाई… हमने हमेशा उनसे दुश्मनी निभाई…अब चाहे जितना मचाओ तू जोर से शोर… पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…

चौदा को तुमने बोहोत भाषण दिलवाये… पाच साल मे लेकिन तुमने किसे कटवाऐ…वी डोन्ट हॅव मनी, मिस्टर मोदी एनी मोर… डोन्ट चीट अस मोदी वीआर नोट फूल्स एनीमोर…'

 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडलोकसभा निवडणूकनरेंद्र मोदीकाँग्रेसभाजपा