कर्मचाऱ्यांना अभिमानाने 'वंदे मातरम्' म्हणू द्या, जबरदस्ती नको!; राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 12:26 PM2022-10-02T12:26:13+5:302022-10-02T12:30:39+5:30

वंदेमातरम म्हटल्यावर इंग्रज रागवायचे, दंड करायचे. महाराष्ट्रात यापुढे फोनवर असो की एकत्र येऊन बोलताना हॅलो ऐवजी, वंदे मातरमने संवादाची सुरुवात करावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने जीआर काढला आहे.

NCP criticizes Shinde-Fadnavis government over GR of saying Vande Mataram instead of Hello on phone | कर्मचाऱ्यांना अभिमानाने 'वंदे मातरम्' म्हणू द्या, जबरदस्ती नको!; राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

कर्मचाऱ्यांना अभिमानाने 'वंदे मातरम्' म्हणू द्या, जबरदस्ती नको!; राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Next

मुंबई: वंदेमातरम म्हटल्यावर इंग्रज रागवायचे, दंड करायचे. महाराष्ट्रात यापुढे फोनवर असो की एकत्र येऊन बोलताना हॅलो ऐवजी, वंदे मातरमने संवादाची सुरुवात करावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने जीआर काढला आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली, यावर आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनीही टीका केली आहे. 

'कर्मचाऱ्यांनी फोन कॉलला उत्तर देताना हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणावे असे आदेश महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केले आहेत.'वंदे मातरम्' भारतीयांमध्ये अभिमानाची व देशभक्तीची भावना जागृत करते. मात्र सक्तीने असे म्हणण्यास भाग पाडणे योग्य नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले.

Vande Mataram GR in Maharashtra: महाराष्ट्रात आता हॅलोऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे; शिंदे सरकारचा जीआर निघाला

कर्मचारी त्यांचे खासगी फोन वापरत असतानाही वंदे मातरम् म्हणण्यास सांगितले जात आहे. हे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांचे उल्लंघन आहे. लोकांवर विशिष्ट प्रकारची मानसिकता लादण्याचा हा प्रयत्न आहे. कर्मचाऱ्यांना अभिमानाने 'वंदे मातरम्' म्हणू द्या जबरदस्ती नको, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली. 

 महाराष्ट्रात आता हॅलोऐवजी 'वंदे मातरम'

महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून २ ऑक्टोबरपासून याची सुरुवात होत आहे.  वंदेमातरम म्हटल्यावर इंग्रज रागवायचे, दंड करायचे. महाराष्ट्रात यापुढे फोनवर असो की एकत्र येऊन बोलताना हॅलो ऐवजी, वंदे मातरमने संवादाची सुरुवात करावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने जीआर काढला आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 

राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन उद्या करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जीआरची माहिती दिली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त विविध स्पर्धा, शिबिरे व सांस्कृतिक कार्यक्रमही होतील.   

 

Gandhi Jayanti 2022 : "...म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कोणी होणे नाही"; राज ठाकरेंची खास पोस्ट

या महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून २ ऑक्टोबरपासून याची सुरुवात होत आहे. आनंदमठमध्ये हे गीत लिहीताना जन गन मन हे राष्ट्र गीत आणि वंदे मातरमला मान्यता देण्यात आली. इंग्रजांना हे गीत त्रास देणारे वाटायचे. हे शब्द आम्हाला प्राण प्रिय आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

संभाषणाची सुरुवात हॅलोने झाली. ती वंदे मातरमने व्हावी, मग ती मोबाईलवर असो की दोघांमधील चर्चा, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच हे अभियान आहे, सक्ती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: NCP criticizes Shinde-Fadnavis government over GR of saying Vande Mataram instead of Hello on phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.