नाकर्त्या सरकारला वठणीवर आणू, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:16 AM2017-09-28T01:16:23+5:302017-09-28T01:16:41+5:30

The Nayak government will come to power, attack on the government of Uddhav Thackeray | नाकर्त्या सरकारला वठणीवर आणू, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

नाकर्त्या सरकारला वठणीवर आणू, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

Next

मुंबई : कुपोषणमुक्तीचे महत्त्वाचे काम करणा-या अंगणवाडी मातांशी चर्चा करण्याऐवजी सरकार संप चिरडू पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये. लोकशाही मार्गाने सरकार ठोकशाही करणार असेल, तर सर्वांना ठोकून काढू. नाकर्त्या सरकारला वठणीवर आणू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने बुधवारी आझाद मैदानात केलेल्या शक्तिप्रदर्शनाच्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही उद्धव यांनी या वेळी कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, पेटलेले आंदोलन भडकवायला आलो नसून, आंदोलनाला ताकद द्यायला आलो आहे. अंगणवाडी कर्मचाºयांची झोप उडवून, मुख्यमंत्री स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परदेशात गेले आहेत, याकडे लक्ष वेधत असा वेडा झालेला विकास राज्याला व देशाला परवडेल का? हा सवालही त्यांनी केला.
अंगणवाडी कर्मचाºयांनी मागणी केलेली वाढ मिळाल्यानंतरही, माता-भगिनींची घरे नीटपणे चालणार नाहीत. तरीही चर्चा करण्याऐवजी सरकार अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर या बहिणींप्रमाणे काम करणाºया योजना कर्मचाºयांमध्ये भांडण लावत आहेत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांनी खचून न जाता आंदोलन सुरूच ठेवावे. सरकारला नमविण्याची ताकद तुमच्यात असून, तुम्ही ठरवाल त्या दिशेला शिवसेना तुमच्यासोबत असेल, अशी ग्वाही उद्धव यांनी उपस्थितांना दिली.

५ आॅक्टोबरला राज्यभर जेलभरो
आझाद मैदानातील या सभेनंतर अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने
५ आॅक्टोबरला राज्यभर जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस कॉ. भालचंद्र कांगो यांनीही अंगणवाडी कर्मचाºयांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

Web Title: The Nayak government will come to power, attack on the government of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.