नॅशनल स्पॉट एक्सेंजप्रकरण, ११५ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 05:01 IST2025-04-03T05:01:28+5:302025-04-03T05:01:56+5:30

National Spot Exchange case: नॅशनल स्पॉट एक्सेंजच्या (एनएसईएल) माध्यमातून झालेल्या ५६०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने सोमवारी ११५ कोटी ८६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये एनएसईएलशी संबंधित मुंबई, दिल्ली, राजस्थान येथील १५ अचल मालमत्तांचा समावेश आहे.

National Spot Exchange case, assets worth Rs 115 crore seized | नॅशनल स्पॉट एक्सेंजप्रकरण, ११५ कोटींची मालमत्ता जप्त

नॅशनल स्पॉट एक्सेंजप्रकरण, ११५ कोटींची मालमत्ता जप्त

 मुंबई - नॅशनल स्पॉट एक्सेंजच्या (एनएसईएल) माध्यमातून झालेल्या ५६०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने सोमवारी ११५ कोटी ८६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये एनएसईएलशी संबंधित मुंबई, दिल्ली, राजस्थान येथील १५ अचल मालमत्तांचा समावेश आहे. आतापर्यंत या प्रकरणात ३३४३ कोटी ६ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. 

काही खासगी कंपन्यांनी छोट्या व्यापाऱ्यांना तसेच सामान्य गुंतवणूकदारांना एनएसईएलच्या माध्यमातून ट्रेडिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ज्या कंपन्यांमध्ये हे ट्रेडिंग होत होते त्या कंपन्या केवळ कागदावरच अस्तित्वात होत्या. एनएसईएलनेदेखील या कंपन्यांच्या माहितीची पडताळणी केली नसल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला असून  ३३४३ कोटी ६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 

लोकांच्या पैशांतून मालामाल
बनावट पद्धतीने सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये सामान्य गुंतवणूकदारांचे ५६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे
या प्रकरणात गुंतलेल्या लोकांनी या पैशातून अचल मालमत्तांची खरेदी केल्याचेदेखील दिसून आले. 
ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू करत मुंबईसह देशात अनेक ठिकाणी या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: National Spot Exchange case, assets worth Rs 115 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.