Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाताई, नशीब तुमची महुआ मोईत्रा केली नाही, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 18:29 IST

Uddhav Thackeray News: अदानी समुहाकडून होणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासाविरोधात आज ठाकरे गटाने महामोर्चा काढला होता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

अदानी समुहाकडून होणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासाविरोधात आज ठाकरे गटाने महामोर्चा काढला होता. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली. तसेच नुकतीच लोकसभेतून निलंबनाची कारवाई झालेल्या महुआ मोईत्रा यांचं उदाहरण देत भाजपाला खोचक टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, वर्षाताई तुम्ही सांगितलंत, प्रश्न विचारला अदानींना, तर भाजपावाले उत्तरं देतात. वर्षाताई नशीब! तुमची महुआ मोईत्रा केली नाही. महुआ मोईत्रा यांनी प्रश्न विचारला म्हणून त्यांना निलंबितच करून टाकलं. नशीब तुम्ही अजून सभागृहात जाताय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

त्यांनी पुढे सांगितले की, यांनी धारावीतील संडास, गटार सगळ्याचा टीडीआर अदानीला दिलाय. फक्त आकाशातून ढगातून पडणाऱ्या पावसाचा तेवढा दिला नाही. यांना ढगांचीही गरज नाही. यांना बिनढगांच्या आश्वासनांचा पाऊस खूप पाडलाय, असा टोलाही त्यांनी लगावला.  

गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प नुसता चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्नासाठी अनेकजण आवाज उठवत आहेत. यात शिवसैनिकांचाही समावेश आहे. मी त्यांना आश्वासन दिलं होतं की, धारावीसाठी गरज पडली तर मुंबईत काय अख्या महाराष्ट्र उतरवेन. आज मुंबईतील मोजके कार्यकर्तेच रस्त्यावर आले आहेत. ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे. त्यांनी हा अडकित्ता लक्षात घ्यावा, हा अडकित्ता आहे. खलबत्ता आहे. त्यात चेचून काढू. पुन्हा अदानीचं नाव काढणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

टॅग्स :उद्धव ठाकरेवर्षा गायकवाडअदानीभाजपा