Narayan Rane : जयंत पाटलांना मी आत्तापर्यंत विद्वान समजत होतो पण; त्या वक्तव्यावरुन फडणवीस भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 14:06 IST2021-08-24T14:03:51+5:302021-08-24T14:06:38+5:30
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी, नारायण राणेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल.

Narayan Rane : जयंत पाटलांना मी आत्तापर्यंत विद्वान समजत होतो पण; त्या वक्तव्यावरुन फडणवीस भडकले
मुंबई - केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल. कारण, त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे, असे थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. जयंत पाटील यांच्या या विधानावर बोलताना फडणवीस यांनी जयंत पाटलांना टोला लगावला.
जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपावर फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे. जयंत पाटील यांना मी आत्तापर्यंत विद्वान समजत होतो. पण, आता त्याची तपासणी करण्याची वेळ जयंतराव येऊ देऊ नका... असे फडणवीस यांनी म्हटले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी, नारायण राणेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल. कारण, त्यांनीच राणेंना मंत्री केलं आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकर खुलासा करावा नाहीतर राज्यात व देशात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजपचे लोक लागले आहेत, असे चित्र निर्माण होईल, असेही जयंत पाटील म्हटले आहे.
नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले
नारायण राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत, याची छोटीशी चुणुक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन राज्याला व देशाला कळली असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.