Narayan Rane : 10 thousand fine as there were 3 people in the shop, then how much to the Finance Minister in Pandharpur? , Narayan Rane | Narayan Rane : दुकानात 3 माणसं होती म्हणून 10 हजार दंड, मग पंढरपुरात अर्थमंत्र्यांना किती?

Narayan Rane : दुकानात 3 माणसं होती म्हणून 10 हजार दंड, मग पंढरपुरात अर्थमंत्र्यांना किती?

ठळक मुद्देराज्यात मिनी लॉकडाऊन केल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. राज्यातील एकही जिल्हा नाही, जिथे व्यापारी रस्त्यावर उतरले नाहीत. दुसरीकडे दुकानदारांकडून वसुली सुरू असल्याचा आरोपही राणेंनी केला

मुंबई - राज्यात गंभीर होत चाललेली कोरोनाची परिस्थिती आणि लसीचा (Corona Vaccination) तुटवडा यांवरून राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. कोरोना लसीच्या कमतरतेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष तटीला पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोक्ष पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच, भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तसेच, मीनी लॉकडाऊनमुळे रस्त्यावर उतरलेल्या व्यापाऱ्यांचेही होत असेलेल हाल सांगितले.   

जी व्यक्ती कुटुंबं सांभाळू शकत नाही, ती व्यक्त कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार, असा सवाल राणे यांनी केला आहे. (narayan rane slams uddhav thackeray over corona situation in the state) अनिल देशमुख, सचिन वाझे प्रकरणावरूनही नारायण राणे यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली, राणे यांनी पत्रकारांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना, मिनी लॉकडाऊन, व्यापार, सचिन वाझे लेटर, अंबानींच्या घरासमोरील स्कार्पिओ कार, यासह अनेक विषयांवर भाष्य केले.  

राज्यात मिनी लॉकडाऊन केल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. राज्यातील एकही जिल्हा नाही, जिथे व्यापारी रस्त्यावर उतरले नाहीत. दुसरीकडे दुकानदारांकडून वसुली सुरू असल्याचा आरोपही राणेंनी केला. जुहूमधील एका दुकाना महापालिकेचे अधिकारी गेले, त्या दुकानात 3 माणसं होते म्हणून 10 हजार रुपये दंड घेतला. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून नीटनेटका धंदा नाही, दिवसभरात एक रुपयाचेही गिऱ्हाईक नाही. पण, 10 हजार रुपयंचा दंड भरावा लागला, असे राणेंनी सांगितले. तसेच, जर व्यापाऱ्याला 10 हजार रुपयांचा दंड, मग पंढरपुरात अर्थमंत्र्यांना किती दंड? असा प्रश्नही राणेंनी विचारला. पंढरपूरात बैठक होती, अर्थमंत्र्यांना मग का नाही नोटीस?, असा प्रश्नही राणेंनी विचारला आहे. 

राज्य सरकारला गांभीर्य नाही

महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. करोना संसर्ग वाढत असताना, त्यावर उपाययोजना करायला हा महाराष्ट्र कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत रूग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यूंची संख्या वाढत आहे. याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. राज्यात डॉक्टर्स नाही. जसे माझे कुटुंब माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचे कुटुंब असेल, तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणे, रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करणे, त्यांना बरं करणे ही तुमची तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात जाऊन बसत आहात, स्वतःला लॉकडाऊन करून घेतले आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, मग कोरोना होईल कसा, असे रोखठोक सवाल नारायण राणे यांनी केले आहेत. 

राधाकृष्ण विखे-पाटील आक्रमक

राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा चिमटा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढला आहे. नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. नगर जिल्ह्यात ४ मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत. जिल्ह्यातील सर्व मंत्री करतात काय, असा संतप्त सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या असून, राज्याला पुरेसे लसीचे डोस मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडून वारंवार केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Narayan Rane : 10 thousand fine as there were 3 people in the shop, then how much to the Finance Minister in Pandharpur? , Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.