चिमुरडीवर बलात्कार करणारा नराधम गजाआड

By Admin | Updated: May 1, 2015 01:16 IST2015-05-01T01:16:24+5:302015-05-01T01:16:24+5:30

पाच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर अ‍ॅन्टॉप हिल पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Naradham Gajaadhar, who raped a little girl | चिमुरडीवर बलात्कार करणारा नराधम गजाआड

चिमुरडीवर बलात्कार करणारा नराधम गजाआड

मुंबई : पाच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर अ‍ॅन्टॉप हिल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोहम्मद रियाझ अली अन्सारी (३२) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारी ताडदेवचा रहिवासी असून वडाळ्यातील एका गार्मेन्टमध्ये कारागीर आहे.
काल पोलिसांनी त्याच्यासोबत काही अन्य संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशीत अन्सारीने गुन्हा कबूल केला. तसेच चिमुरडीनेही त्याला ओळखले. २१ एप्रिलला ही चिमुरडी आईच्या सांगण्यावरून दुकानात खरेदीसाठी आली होती. संधी साधत अन्सारीने तिला आमिष दाखवून अपहृत केले होते. अत्याचारात गंभीररीत्या जखमी झालेल्या या चिमुरडीवर सायन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Naradham Gajaadhar, who raped a little girl